वाचा: MH13 NEWS च्या बातमीच्या दणक्याने पाटबंधारे विभागाला आली जाग!

0

MH13 NEWS NETWORK:

काल सांगवी बु येथील “बोरी नदी पडणार लवकरच कोरडी…!” या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध होताच, अक्कलकोट नगरपालिका, व पाटबंधारे विभाग खडबडून जागे झाले असून, त्यातच जनसेवक विध्यमान आमदार सचिन कल्यांणशेट्टीयांनी तत्काळ नगरपालिकेच्या व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक आयोजित केली होती.
काल सायंकाळी 5 वाजता सांगवी येथे जाऊन जलाशयाची पाहणी केली अधिकारी वर्गांना चांगलेच धारेवर धरले असून, अतिवृष्टीमुळे शेतकरी मेटाकुटीला गेला असताना त्याच आणखीन भर म्हणून पाटबंधारे विभागाचे अधिकारी वर्ग २०१७ साली खालच्या नदीपात्रात पाणी सोडण्याचा आदेशानुसार आम्ही हे जलाशयातील प्लेट फोडून पाणी सोडून पुन्हा दुरुस्त करून देऊ म्हणून हे कारस्थान केल्याने शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे.

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची अवस्था अगदी धुळीला मिळालेली असताना, आता पुढील पिकांचे तरी नियोजन करून उपलब्ध बोरीतील पाणी साठ्याचा वापर करून पूढील पिकांवर आपले उदरनिर्वाह करता येईल म्हणून, या आशेवर बसलेल्या सांगवी बु सह कोळेकरवाडी, शिरशी, किणीमोड तांडा, भागातील तमाम बळीराजा ला या गळतीचे ग्रहण लागले असून, येत्या 15 दिवसांत सत्तर टक्के नदी रिकामी होईल अशा अंदाज गावकऱ्यांतुन व्यक्त होत असून, त्यातच अक्कलकोट नगरपालिकेला पण पाणीपुरवठा चालू असल्याने, मग पुढील गावातील पिण्याच्या पाण्याची नियोजन कसे करायचे…..? शेतकरी पाण्याअभावी पिके कशी जगवायची अशा प्रश्न पंचक्रोशीतील नागरिकांना पडला असून…? पाईपलाईन केलेल्या शेतकऱ्यांची कर्जकाढुन केलेली पाईपलाईन बँकेची परतफेड न झाल्याने आता शेती विकण्याची वेळ येऊन ठेपली आहे. इथे पाटबंधारे विभागा मात्र झोपेचे सोंग घेत आहे.
अक्कलकोट तालुक्यातील सांगवी बु जलाशयातील गळती संदर्भात MH13 NEWSच्या बातमीची दखल घेत आमदार सचिन कल्यांणशेट्टी व मुख्याधिकारी आशा राऊत उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे, न पा कर्मचारी बागवान , मलिक, शिरवळ युवा नेते आप्पू बिराजदार, गावचे सरपंच अबुबकर शेख, मेजर बाळासाहेब भोसले, उपसरपंच विष्णू देवकर, अंकुश घाटगे, प्रदीप सलंबत्ते पत्रकार प्रविणकुमार बाबर, खासीम शेख, गुणवंत लवटे, राम लवटे, गुरव सर यासह बहुसंख्य नागरिक पाहणीसाठी उपस्थित राहून व्यथा मांडल्या, व आमदार सचिन कल्यांणशेट्टी यांनी मुख्याधिकारी आशा राऊत यांना तातडीने काम करण्याचे आदेश दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here