जामिन फेटाळला ; महानगरपालिका बनावट ले आऊट प्रकरण…

0

MH13NEWS Network

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेचे नगर रचना विभागातील मानधन आवेक्षक राजकुमार मेश्राम यांनी सोलापूरातील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती आर. डी. खेडेकर यांचे न्यायालयात जामिनीचा अर्ज दाखल केला असता त्याला सरकारपक्षातर्फे तीव्र हरकत घेवून युक्तीवाद केला असता सरकारपक्षाचा युक्तीवाद ग्राहय धरुन राजकुमार मेश्रामचा जामीनीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला.

सदर आरोपींच्या विरोधात सदर बझार पो.स्टेशन येथे भा.द.वि, कलम 420, 465, 468, 471, 120 ब सह 34 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला असून सदर गुन्हयाची फिर्याद सोलापूर महानगरपालिकेचे ज्युनिअर इंजिनिअर महेश क्षिरसागर यांनी दिलेली आहे.

हकिकत अशी की…

मौजे दहिटणे येथील सर्व्हे नं. 34/43/3(पीटी) या जागेचे मालक नामे 1) यासीन अमिर हमजा मोतीवाला, वय-40 वर्षे 2) रफिक अमिर हमजा मोतीवाला, वय-38 वर्षे 3) वसीम अमिर हमजा मोतीवाला वय-36 वर्षे, सर्व रा. 3/10, समर्थ नगर, उत्तर सदर बझार, सोलापूर यांनी नमूद जागा विकसीत करण्यासाठी, सोलापूर महानगरपालीका नगर रचना विभागाकडून प्राथमिक मंजूरी आदेश मिळविला. त्यानंतर दिनांक 17/01/2016 ते 27/10/2020 या कालावधीत आरोपीशी संगनमत करून नमूद ले आउटबाबत बनावट अंतिम मंजूरी आदेश पत्र तयार करुन त्या ले आउटमधील प्लॉट ग्राहकांना लवकरात लवकर विक्री करून ज्यादा नफा मिळविण्याच्या उद्देशाने नमूद ले आउटमधील प्लॉट क्रमांक 07 हा सोनाली कमलेश महिंद्रकर यांना विक्री करताना नमूद बनावट अंतिम आदेश याचा वापर करून ग्राहक सोनाली महिंद्रकर व सोलापूर महानगरपालीकेची फसवणूक केली आहे.

ही बाब नगर रचना कार्यालय, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर विभागातील अवेक्षक श्री. महेश क्षीरसागर यांनी वर नमूद इसमांविरुध्द फिर्याद दिल्याने सदर फिर्याद सदर बजार पोलिस स्टेशन, सोलापूर शहर येथे गु.र.नं.1560/2020 कलम 465, 468, 471, 34 भा.दं. वि.सं. प्रमाणे दिनांक 09/12/2020 रोजी नोंद करण्यात आलेली आहे. सदर गुन्हयाच्या तपासात गुन्हयाच्या कलमात कलम 120(ब), 420 भा.दं.वि. प्रमाणे वाढ करण्यात आलेली आहे.

आरोपी राजकुमार हा नगररचना विभाग, महानगरपालिका, सोलापूर येथे मानधन आवेक्षक म्हणून नोकरीस होता. शहर हददीतील जमीन मालक/विकासक यांचे प्राप्त अर्जानुसार जागेचे अभिन्यास (लेआउट) ची मंजूरी करीता अर्ज व नकाशे छाननी अहवाल तयार करून वरिष्ठांचे स्वाक्षरीसाठी सादर करणे व विकसन परवाना घेण्याचे काम करीत असे. तसेच शासकीय जागा तसेच महाराष्ट्र प्राधिकरण व नगर रचना अधिनियम 1966 चे तरतूदीनूसार प्राप्त नोटीसी संदर्भात प्रस्ताव तयार करणे इत्यादी कामे करणे हे कामकाज पाहत असे.

सदरच्या गुन्हयामध्ये बनावट अंतीमे लेआउटमध्ये नमूद करण्यात आलेले क्रमांक आणि हस्ताक्षर हे अटक आरोपी राजकुमार मेश्राम याचे असल्याचे नगर रचना विभाग सोलापूर महानगरपालिका येथील जमादार/रबर स्टॅम्प कस्टेडीयन श्री. सुरेश पागद यांनी सांगितले आहे. सदर आरोपीने लेआउट मंजुरीकरीता देण्यात येणारे शिक्के स्वत:मारून त्यावर स्वतःच्या हस्ताक्षरात बनावट आदेश क्रं. 165 दिनांक 06/04/2017 असे आणि तत्कालीन सहा.संचालक श्री. क्षीरसागर यांची बनावट स्वाक्षरी केलेली असल्याचे सांगितले आहे. तसेच बनावट लेआउट करण्याकरीता आरोपीने अर्जदाराकडून 25000/- इतकी रक्कम घेतल्याचे सांगितले आहे. आरोपीने बनावट लेआउट तयार करण्यासाठी विकसन परवाना त्यांच्या कार्यालयातील ऑपरेटर श्री. कुष्णा कटकधोंड यांच्या कडून टंकलिखीत करून घेवून त्यावर स्वतःच्या हस्ताक्षरात बनावट जावक क्रमांक आणि तत्कालीन सहा. संचालक श्री. विजयकुमारी राठोड यांची स्वाक्षरी केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here