जिथं ॲडमिट तिथलीचं औषधे.? रुग्णांसाठी,नातेवाईकांसाठी सर्वात मोठी बातमी…

0

महेश हणमे /9890440480

तुमचा एखादा नातेवाईक किंवा कुटुंबातील सदस्य दवाखान्यात उपचारासाठी दाखल झाला असता औषधे, गोळ्या, इंजेक्शन त्या हॉस्पिटलमध्येच असणाऱ्या मेडिकल शॉप मधून खरेदी करावी लागते.यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांसोबत हॉस्पिटल प्रशासनाचे नेहमीच वाद होत असतात. त्यावर शासनाने रामबाण उपाय शोधला असून रुग्णालयातील औषधी दुकानातून औषधी खरेदी करण्याची सक्ती न करणेबाबतचे निर्देश दिले आहेत.

औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० व त्याअंतर्गत नियम रुग्णांना रुग्णालयातील औषधी दुकानातून औषधी खरेदी करण्याची सक्ती न करणेबाबतचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला असून 9 डिसेंबर रोजी या संदर्भातील परिपत्रक जाहीर करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

सर्व विभागीय सहआयुक्त, सहायक आयुक्त व औषध निरीक्षक (औषधे) यांना या परिपत्रकाद्वारे करण्यात आले आहे की, रुग्णांना रुग्णालयातील औषधी दुकानातून औषधी खरेदी करण्याची सक्ती केली जाते अशा तक्रारी वारंवार प्रशासनास प्राप्त होत आहेत. अशा प्रकारे रुग्णांलयाने त्यांचे संलग्न दुकानातूनच औषधे खरेदी करण्याची रुग्णांना सक्ती करणे ही बाब नियमबाहय आहे.
असे स्पष्टपणे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

“रुग्णालयातील औषधी दुकानातूनच रुग्णांनी औषधांची खरेदी करावी अशी सक्ती नाही, रुग्णालयातील रुग्ण व त्यांचे नातेवाईक कोणत्याही परवानाधारक औषध विक्रेत्याकडून औषधांची खरेदी करु शकतात” अशा आशयाचा फलक ठळकपणे संबंधित रुग्णालयांनी रुग्णांना दिसतील अशा दर्शनीय भागात प्रदर्शित करावा, अशा सूचना सुद्धा या परिपत्रकाद्वारे देण्यात आलेले आहेत यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

अशा प्रकारच्या सूचना सर्व विभागीय सहआयुक्त, सहायक आयुक्त व औषध निरीक्षक (औषधे) यांनी आपले विभागातील सर्व रुग्णालयातील परवानाधारक औषध विक्रेत्यांना देण्यात याव्यात.असेही यात उल्लेख केला आहे.

अभिमन्यू काळे,आयुक्त,अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य,मुंबई यांनी सदरचे पत्रक प्रसिद्ध केले आहे.

सोलापुरात सुरू झाली कार्यवाही…

रुग्णासाठी तसेच रुग्णांच्या नातेवाईकांसाठी ही महत्त्वाची बाब असून महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या या निर्णयाची माहिती संदर्भातील सर्व विभागाला देण्यात येत आहे. रुग्णालयाच्या दर्शनी भागात अशा पद्धतीचे बोर्ड लावावेत अशा सूचना दिल्या जात आहेत.

सचिन कांबळे, सहाय्यक आयुक्त अन्न औषध प्रशासन सोलापूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here