मँक्स क्रिप्टो | ‘पुलगम’चे मालक नित्यानंद पुलगम यांना अंतरीम अटकपूर्व जामीन मंजूर

0

MH 13 News Network

आत्महत्येस प्रवुत्त केल्याप्रकरणी पुलगम टेक्स्टाईलचे मालक नित्यानंद पुलगम यांना अंतरीम अटकपूर्व जामीन मंजूर..

सोलापूर-मँक्स क्रिप्टो कंपनी बंद पडल्याने गुंतवणूकदारांनी पैशाची मागणी करून त्रास देऊन किरण मंगलपल्ली यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पुलगम टेक्स्टाईल चे मालक नित्यानंद पुलगम रा.दाजी पेठ,सोलापूर याचा अंतरीम अटकपूर्व जामीन अर्ज मे.अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री.भोसले  यांनी मंजूर केला.

यात हकिकत अशी की, सन २०२२ मध्ये आक्टोबंर महिन्यात मॅक्स क्रिप्टो या कंपनी मधे लोकांची फसवणूक झाली म्हणून वर्तमानपत्रात बातमी आली होती. त्यामधे न्यू पच्छा पेठ येथील मॅक्स क्रिप्टो कंपनी बद्दल माहिती आली व किरण हे गुंतवणूक दाराचे पैसे देण्यास टाळाटाळ करत आहेत अशी बातमी आली.

दि.०१/१२/२०२२ रोजी फिर्यादीचे पती घरातून नेहमीप्रमाणे कामाला जातो असे सांगून घरातून निघून गेले. 2/12/2022 रोजी फिर्यादीचे घरी फिर्यादी व तिचे सासरे घरी असताना गिरीश चिप्पा, तुषार चिप्पा, अन्वर छुरि , निलेश वाघमोडे व राहुल कुरापती असे सर्वजण एकत्र येऊन फिर्यादी चे पती कुठे आहेत, त्यांचा मोबाईल लागत नाही असे विचारले व त्यांनी फिर्यादीस किरण यास बोलावून घ्या आपण सेटलमेंट करू असे सांगितले व निघुन गेले. तद्नंतर फिर्यादीच्या पतीने सांगली येथील लाँजमध्ये नित्यानंद पुलगम, निलेश वाघमोडे, गिरीश चिप्पा,तुषार चिप्पा, अनवर छुरी,श्रीकांत बसाटे,विग्नेश्वर काँपेव्हा,पोशेट्टी येमुल,कुष्णा आडम,श्रीनिवास मिसालोलू,प्रविण चिप्पा, अमर मोठे, विशाल मिठ्ठा,राहुल कुरापाटी,विनोद कामुनी,ऋषी महेश्वरम,अमर एक्कलदेवी,मोतीलाल गुंनाळ व गणेश आडम यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली असल्याचे फिर्याद जेलरोड पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली होती.
सदर गुन्हयामध्ये अटक होईल ह्या भितीपोटी आरोपी नित्यानंद पुलगम याने अँड. संतोष न्हावकर यांच्या माफत अंतरीम अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता.
यात आरोपीतफे युक्तिवाद करताना अँड. संतोष न्हावकर यांनी रक्कम वसूलीसाठी प्रयत्न करणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे असे म्हणता येणार नाही व उशिरा दाखल केलेल्या फिर्यादीवर विश्वास ठेवता येणार नाही, असे कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले व त्याप्रुष्ठर्थ उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे न्याय निवाडे दाखल केले सदरचा युक्तिवाद ग्राह्य माणून मे.कोर्टाने आरोपीस अंतरीम अटकपूर्व जामीन मंजूर केला.
यात आरोपी तफेँ अँड. संतोष न्हावकर,अँड. वैष्णवी न्हावकर, अँड.राहुल रुपनर,अँड. शैलेश पोटफोडे,अँड. विष्णू बाबर हे काम पहात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here