मातृदिनी घडलं ‘माऊली’च दर्शन ; आमराईत नटली विठू-रखुमाई

0

MH13 NEWS Network 

आज दि. १० मे रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यास ३१०० रत्नागिरी हापुस आंब्यानी व आंब्याच्या पानांनी आकर्षक अशी आरास करण्यात आली त्यामुळे गाभाऱ्यास मनमोहक असे आमराईचे स्वरूप प्राप्त झालंय.कोरोनाचे विश्वावर ओढावलेले संकट दूर करण्यासाठी बा…विठ्ठलाच्या चरणी ही मनमोहक पूजा अर्पण करण्यात आली आहे.

आमराईत नटली विठू-रखुमाई

वैशाख संकष्टी चतुर्थी निमित्ताने पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आंब्याची नेत्रदीपक आरास करण्यात करण्यात आली आहे.रत्नागिरी येथून खास मागविण्यात आलेल्या 3100 हापूस आंब्याने
श्री विठ्ठलाचे गाभारा, चौखांबी आदी ठिकाणी आंब्याची आरास करण्यात आल्याने श्री विठ्ठल आमराईत उभा असल्याचा भास होत असून देवाचे हे लोभस रुप आज अधिकच खुलून दिसत आहे
श्री विठ्ठला प्रमाणे श्री रुक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात आंब्याची मनमोहक अशी आरास करण्यात आली आहे.
कोरोनाचे विश्वावर ओढावलेले संकट दूर करण्यासाठी बा…विठ्ठलाच्या चरणी श्री विठ्ठल भक्त हरीश बैजल (अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक महाराष्ट्र सायबर सेल) अजय सालुखे (उद्योगपती पुणे), उमेशभाई भुवा (सांगली) दीपकभाई शहा (सांगली) सुनील उंबरे (पंढरपूर) या भक्तांनी आंब्याची पूजा अर्पण केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here