मराठा आरक्षणाची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयावर कारवाई करा : सकल मराठा समाज

0

By-MH13NEWS,नेटवर्क
मराठा आरक्षण नोव्हेंबर 2018 पासून महाराष्ट्र राज्यामध्ये लागू झालं असून चालू शैक्षणिक वर्षापासून याची योग्य त्या प्रकारे अंमलबजावणी करण्याची मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने शिक्षणाधिकाऱ्यांना शुक्रवारी दि.१४ जून रोजी करण्यात आली.

सोलापूर शहर व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठीची अकरावी ते बारावी प्रवेश प्रक्रिया चालू झाली आहे. सर्व महाविद्यालयांनी त्यांचे फॉर्म विद्यार्थ्यांना द्यायला सुरू केले आहेत.त्यामध्ये एससी, एसटी,ओबीसी या आरक्षणाच्या जागा सोडण्यात आल्या असून एसईबीसी च्या जागेचा कुठेही उल्लेख आढळुन येत नाही. प्रचंड मोठ्या जनआंदोलना नंतर मराठा आरक्षण लागू करण्यात आलं आहे. तरीही सोलापूर शहर व जिल्ह्यातील महाविद्यालयांनी त्याची अंमलबजावणी करण्याकरिता कोणतीही पूर्तता केलेली नाही. त्यामुळे त्यांच्यावर मराठा आरक्षणाच्या कायदा मोडल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मोरे यांना सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आले.
यावेळी समन्वयक माऊली पवार,नगरसेवक विनोद भोसले, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष भाऊसाहेब रोडगे, एन एस यु आय चे जिल्हाध्यक्ष गणेश डोंगरे, शाहू सलगर, गणेश देशमुख,सौरभ साळुंखे, वाडकर आदी समाजबांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here