MH 13 News Network
अल्पावधीत चर्चेचा विषय ठरलेले मनीष काळजे यांची शिंदे गटाच्या वैद्यकीय मदत पक्षाच्या जिल्हा संपर्कप्रमुख पदावरून तातडीने हकालपट्टी करण्यात आल्याचे पत्र आज सोलापुरात धडकले आहे. मुरलेल्या आरोग्य इंजेक्शनचा ‘शीतल’ झटका की शासकीय कार्यालयात धडकणारी जिल्हाप्रमुख काळजे यांची ‘पत्रे’ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळ,समर्थक आणि गटातील हितचिंतकांमध्ये सुरुय.
सोलापूर शहरातील शिंदे गटांचे खंदे समर्थक अशी प्रतिमा मनीष काळजे यांनी मिळवली.
कार्यालयाच्या उद्घाटनासाठी दस्तूर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते .त्यावरून जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मनीष काळजे यांचे पारडे जड ठरले, परंतु अनेक शासकीय कार्यालयात धडकणारी त्यांची पत्रे पाहून अनेकांना नवल तर काहींना धास्ती बसली होती. आरोग्य मंत्री तानाजी सावंत आणि मंगेश चिवटे यांच्याशी असलेल्या संबंधांमुळे प्रशासनावर दबाव पडत होता. त्याच सोबत थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी फोन पे चर्चा होत असल्याने इतर जिल्हा प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांपेक्षा अण्णांचे पारडे जड झाले होते. आरोग्य अधिकारी यांच्या तडकाफडकी बदलीनंतर आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषद मध्ये काळजे हे चर्चेचा विषय बनले होते.
मुख्यमंत्र्यांच्या जवळचा माणूस एका तालुक्यातील अंमलदाराची बदलीची मागणी करतोय हे मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पचनी पडेना.पत्राचे ‘उत्तर’ कोणत्या स्वरूपात द्यायचे याची चर्चा सुरू झाली. काही ‘उत्तर’ देण्यात आले तर काही ठराविक अंतराने देण्याचा निर्णय ‘थोरा’मोठ्याच्या साक्षीने झाला.इकडे गडचिरोली मध्ये सुद्धा खलबते होत होती. मुरलेले ‘शितल’ इंजेक्शन देण्याच्या तयारीत बसलेले होते. परंतु वेळ साधत नव्हती. काही बाबतीत ‘अर्थ’ हा ‘पूर्ण’ होत नव्हता.
जिल्ह्याच्या नियोजन समितीमध्ये वर्णी न लागणे यामागे नेमकं कारण काय.? याची चर्चा शिंदे गटातील काळजे यांचे समर्थक आणि हितचिंतकांमध्ये घडत होती. वरिष्ठ पातळीवर शासकीय कार्यालयात काळजे यांची धडकणारी पत्रांची इत्यंभूत माहिती देण्याचे काम हितचिंतक मंडळी कडून चोख बजावण्यात आले आणि आज रविवारी दुपारी जिल्हा संपर्क प्रमुख पदावरून काढण्यात आल्याचे पत्र सोलापुरात दाखल झाले.
हाच तो मजकूर…
पद नियुक्ती रद्द करणे बाबत…
आपणास कळविण्यात येते की, आपली शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली होती.परंतु काही अपरिहार्य कारणास्तव आपली पद नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. कृपया याची आपण नोंद द्यावी.असे तातडीने पत्र पाठवण्यात आलं आहे.
आता, याचे सोलापुरातील शिंदे गटात कोणते पडसाद उमटतात याची चर्चा सुरू आहे. मध्यंतरी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मनीष काळजे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटात प्रवेश केला होता आता त्यांचे राजकीय भवितव्य काय..? याबाबतीत शंका व्यक्त करण्यात येत आहेत.
प्रतिक्रिया..
वैद्यकीय मदतीच काम हे गोरगरिबांसाठी चालूच राहील ….
पक्षाचा जिल्हाप्रमुख शिवसेना जिल्हाप्रमुख हे पद माझ्याकडे आहे. एका वेळेस दोन पद ठेवणे योग्य नाही माझ्या ऐवजी कोणाला चांगले संधी मिळत असेल तर
तर ते पद देण्यात याव…यासाठी माझ पद रद्द करण्यात आल आहे .वैद्यकीय मदतीच काम हे गोरगरिबांसाठी चालूच राहील ….
मनीष काळजे,जिल्हाप्रमुख, शिंदे गट