स्तुत्य उपक्रम | बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी युवासेनेचे महारक्तदान शिबीर.!

0

युवा सेनेच्यावतीने आज सोलापुरात महारक्तदान शिबीर आणि ५ शाखांचे उद्घाटन !

सोलापूर – ( प्रतिनिधी ) – शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोलापूर युवा सेनेच्यावतीने आज सोमवार २३ जानेवारी रोजी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच विविध ठिकाणी एकूण ५ शाखांचे उद्घाटन युवा सेनेचे राज्य विस्तारक तथा सोलापूर संपर्कप्रमुख उत्तम आयवळे यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती युवा सेनचे शहर प्रमुख विठ्ठल वानकर यांनी दिली.


सोमवारी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत इंद्रप्रस्थ कार्यालयात महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दुपारी दोन नंतर शहरातील महाविद्यालय तसेच प्रभागांमध्ये एकूण ५ युवा सेनेच्या शाखांचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.

सोमवारी दिवसभर होणाऱ्या या कार्यक्रमासाठी युवा सेनेचे शहर आणि जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाप्रमुख बालाजी चौगुले आणि शहर प्रमुख विठ्ठल वानकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here