तालुका हादरला | पोटचा गोळा बसला उरावर ; आठवड्यात 2 खून…वाचा

0

शेखर म्हेञे /माढा प्रतिनिधी

अंजनगाव उमाटे ग्रामपंचायत हद्दीतील स्वतःच्या मालकीचे गाळे विक्री करण्यास ठाम असणाऱ्या स्वतःच्या पित्यास मुलाने गळा दाबून संपवल्याची घटना अंजनगाव उमाटे येथे काल दुपारी 12.15 सुमारास घडली आहे. जन्मदात्या पित्यास संपवल्याची धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

माढा तालुक्यातील अंजनगाव उमाटे येथील याबाबतचे सविस्तर वृत्त असे की मयत रमेश विठ्ठल माळी (वय 50 )हे त्यांच्या स्वतःच्या मालकीचे गाळे विक्री करणार असल्याचा राग आरोपीे गणेश माळी (वय 23) याला आला होता या रागातुन वडिल व मुलामध्ये वाद झाला यातुन आरोपी गणेश माळी याने स्वतःच्या वडिलांना मानेवर मारुन त्यांना खाली पाडत त्यांना मारहाण केली व त्यांचे नाक व तोंड दाबुन गळा आवळुन जीवे मारल्याची फिर्याद मयताची पत्नी अंजना रमेश माळी (वय 45) हिने माढा पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली.

त्यानुसार गणेश माळी याच्या वर कलम 302, 323 प्रमाणे गुन्हा नोंद करून त्याला ताब्यात घेतले आहे. या आठवड्यातील मुलाने बापाला संपवण्याची ही दुसरी घटना असल्याने माढा तालुका हादरला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमुल कादबाने हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here