शेखर म्हेञे/ माढा प्रतिनिधी
जगावर आलेल्या कोरोना विषाणूच्या संकटामुळे 22 मार्च पासून संपूर्ण देशात लाॅकडाऊन जाहीर करण्यात आला यामुळे देशातील गोरगरीब मुजर व बेरोजगार नागरिकांवर उपासमारीची वेळ आली होती. शासनाच्या वतीने स्वस्त धान्य दुकानातून तांदूळ व गहूच्या स्वरूपात काही प्रमाणात मदत केले गेली असली तरी गोरगरीब ,बेरोजगार नागरिकांना ती पुरेशी पडणारी नसल्याने खाजगी संस्था, दानशूर व्यक्ती व काही स्वयंसेवी संस्थांनी सढळ हाताने माढा तहसील मध्ये किराणा मालाचे कीट व अन्नधान्याची मदत केली. ती मदत मोठ्या प्रमाणावर गोळा झाली परंतु प्रशासनाने किटच्या वाटपाचे व्यवस्थापन चुकिच्या पध्दतीने केल्याने व गलथान कारभारामुळे दानशूर व्यक्तींनी केलेली पुरेशी मदत गोरगरीब नागरिकांनपर्यंत पोहचली नाही या कारणाने आज माढा तहसीलच्या निवडणूक विभागाच्या हाॅल मध्ये मोठ्या प्रमाणात किराणा मालाचे किट व अन्नधान्य वाटपाच्या प्रतिक्षेत आहे.
लाॅकडाऊन काळात माढा तहसीलदारांनी किराणा माल व अन्न धान्य एकञ गोळा करून वाटप करण्याच्या योजनेला व त्यांनी केलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी गावागावातून ,वाड्या-वस्त्या व खाजगी संस्थांनी गोळा केलेल्या अन्न धान्य असे गोरगरीब लोकांनपर्यंत न पोहचता असेच पडुन राहील असे काही मदत करणाऱ्यांनी मत व्यक्त केले. तहसील कार्यालयात जमा केलेली ती मदत खूप मोठ्या प्रमाणात झाली होती बऱ्याच अंशी तहसील मार्फत मदत गोरगरीबांन पर्यंत पोहचली असली तरी देखील मदत केलेल्या मालापेक्षा शिल्लक राहिलेले साहित्य मोठ्या प्रमाणात आज तागायत तहसील कार्यालयात पडून असल्याचे चित्र आहे . यातील काही भिजलेल्या वस्तू मध्ये कुबट वास येत असल्याचे बोलले जात आहे. परंतु ज्या वेळेस हे अन्न भिजलेल्या स्वरूपात आले होते त्यावेळेसच त्याचे वाटप केले असते तर काही प्रमाणात का होईना त्या अन्नाची नासाडी झाली नसती यावरून प्रशासनाचा सावळा गोंधळ लक्षात येतो.
यापुढे तरी अशा गोष्टी होऊ नयेत. आता या मालाचे वाटप केले तरी त्याचा फारसा उपयोग होणार नाही कारण आज बऱ्यापैकी मजुरांना हाताला काम आहे व रोजगार उपलब्ध होत आहेत . ज्यावेळेस त्यांच्यावर उपासमारीची वेळ होती त्यावेळेस हे अन्न माढा तहसीलच्या हॉलमध्ये पडून होते .त्यांना त्या मालाची गरज असताना
त्यांच्यापर्यंत पोहचले नाही आणि आता 4 महिन्यानंतर हे अन्न वाटप केले जाईल हे काही रुजणारी गोष्ट नसल्याचे दिसत आहे.
माझे संबंधित अधिकाऱ्याशी बोलणं झालं असून राहिलेला किराणामाल उद्यापासून गरजू व्यक्तींना वाटत केला जाणार आहे..
ज्योती कदम ,प्रांताधिकारी कुर्डूवाडी.
या गोष्टीची विचारपुस माढा तहसीलदारांना केली असता आम्ही उद्यापासून गरजू व्यक्तींना याचे वाटप करणार आहोत असे सांगण्यात आले. मोडनिंब भागातून आलेले साहित्य हे काही प्रमाणात भिजलेले असल्याने वास येत असेल ..
राजेश चव्हाण ,माढा तहसीलदार.
सोलापुरातील आजच्या पत्रकार परिषदेत माढा येथील तहसील हॉल मध्ये वाटप न करता तसेच ठेवलेल्या अन्न धान्याच्या पॅकेट विषयी थेट जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना प्रश्न विचारला असता त्यांनी याप्रकरणाची माहिती घेतो. संबंधित अधिकाऱ्याला त्वरित कार्यवाहीसाठी सांगतो असे आश्वासन विशेष प्रतिनिधीशी बोलताना दिले