लोकमंगल इंग्लिश मीडियम स्कूल आणि जूनियर कॉलेजमध्ये गुरुपौर्णिमा, टिळक जयंती उत्साहात

0

MH13NEWS Network

लोकमंगल इंग्लिश मिडीयम स्कूल आणि जूनियर कॉलेज यांच्यावतीने ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने गुरु पौर्णिमा म्हणजेच व्यास पौर्णिमा हा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्रीकांत धारूरकर हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकमान्य टिळक आणि सरस्वती प्रतिमेचे पूजन माननीय प्राचार्यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर कार्यक्रमांमध्ये वैष्णवी शिरसाट, आर्या पवार, वैष्णवी पवार, इत्यादी विद्यार्थ्यांची भाषणे ऑनलाइन झाली.
सदर कार्यक्रमाला कनिष्ठ महाविद्यालयाचे परिसरातील काही निवडक विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रसंगी आशुतोष देशमुख यांनी पोर्णिमेचे महत्व विषद केले.


गुरु हा वंदनीय आहे गुरु हा पूजनीय आहे गुरु हा शक्तीदाता आहे गुरु हा प्रेरणादायी आहे असे गौरवोद्गार काढून प्राचार्य श्रीकांत धारूरकर यांनी गुरूपौर्णिमेचे महत्त्व विद्यार्थ्यांना विशद केले . कार्यक्रमात शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे गौरवोद्गार काढून विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळकांच्या कार्याचा आढावा घेतला आणि त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले.
कार्यक्रमाच्या प्रसंगी निनाद कुलकर्णी अनिल देवकर नंदकुमार स्वामी ओंकार पेठे दिपक कापसे राधिका भोसले नफिसा तांबोळी अपर्णा माशाळ अश्विनी टोणपे दिपाली शिंदे सविता पाटोळे आशुतोष देशमुख आदी शिक्षक उपस्थित होते.
सदरचा कार्यक्रम सामाजिक अंतर राखून आणि कोरोना नियमांचे पालन करून घेण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here