लोकमंगल बँकेतर्फे सोलापूर शहरातील लॉन्ड्री व्यावसायिकांना प्रधान कार्यालयातील सभागृहात बँकेचे अध्यक्ष आ. सुभाष देशमुख यांच्या हस्ते कर्ज वितरण करण्यात आले.
लॉकडाऊनच्या काळात आ.देशमुख यांनी शहरातील सर्व लॉन्ड्री व्यावसायिकांशी कॉल कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला होता. त्यावेळी व्यवसायिकांनी आमदार देशमुख यांच्याकडे बँकेच्या माध्यमातून आर्थिक मदत करावी अशी मागणी केली होती. त्यावेळी आमदार देशमुख यांनी लवकरात लवकर व्यावसायिकांना मदत करण्याचे आश्वासन दिले होते.
याचाच पहिला टप्पा म्हणून बँकेतर्फे काही व्यवसायिकांना आ. देशमुख यांच्या हस्ते कर्ज स्वरूपात मदत करण्यात आली.
यावेळी संचालक शहाजी पवार, अविनाश महागांवकर , सोलापूर शहर परीट समाज सचिव नंदकुमार भोसले, महिलाध्यक्षा रागिणी काटकर, सचिन चौगुले, बँकेचे व्यवस्थापक प्रशांत अंबुरे यांच्यासह सोलापूर शहरातील लॉन्ड्री व्यावसायिक उपस्थित होते.