यंदा..लोकमंगल विवाह सोहळा होणार काडादी मंगल कार्यालयात ; हे आहे कारण

0

लोकमंगल विवाह सोहळा कार्यस्थळात बदल

काडादी मंगल कार्यालयात होणार शुभमंगल
सोलापूर
लोकमंगलच्यावतीने आयोजित 16 व्या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या कार्यस्थळात बदल करण्यात आला आहे.  हा सामूहिक विवाह सोहळा विजापूर रोडवरील  शिवाजी अध्यापक विद्यालय नेहरूनगर (डी एड कॉलेजच्या) मैदानावर होणार होता. पण सोलापुरात सध्या पावसाचे वातावरण आहे. त्यामुळे हा विवाह सोहळा आता सिद्धेश्‍वर साखर कारखान्याजवळच्या काडादी मंगल कार्यालयात होणार असल्याची माहिती संस्थापक, आ. सुभाष देशमुख यांनी दिली

.
गेल्या दोन- तीन दिवसांपासून शहरात पाऊस पडत आहे.  आणखी दोन- तीन दिवस पाऊस पडेल असा हवामान खात्याचा  अंदाज आहे. या स्थितीचा विचार करून वधू-वरांची आणि वर्‍हाडी मंडळींची तारांबळ होऊ नये म्हणून हा विवाह सोहळा आता सिद्धेश्‍वर साखर कारखान्याजवळच्या काडादी मंगल कार्यालयात होणार आहे. तरी विवाह सोहळ्याशी संबंधित लोकांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन आ. सुभाष देशमुख यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here