लॉकडाऊन : विठुरायाचे मंदिर 17 मे पर्यंत बंद ; नित्य पुजोपचार राहणार सुरू

0

MH13 NEWS Network 

असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असणारे विठुरायाचे मंदिर लॉक डाऊन वाढल्यामुळे 17 मे पर्यंत बंद राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे अशी माहिती विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.

कोरोना व्हायरस (कोविड-१९) चा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढला आहे. हा व्हायरस तीव्र संसर्गजन्य स्वरूपाचा असलेने महाराष्ट्र राज्यामध्ये दिवसेंदिवस रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे तातडीने खबरदारीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याने,भाविकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर दि.१७ मार्च २०२० ते दि.०३ मे २०२० या कालावधीत भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आलेले होते.

सद्यस्थितीत दि.०२ मे रोजी केंद्र शासनाने दि.१७ मे २०२० पर्यंत संपूर्ण देशभरात लॉकडाऊन घोषित केलेला आहे. तसेच महाराष्ट्र राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढला आहे. तसेच आपल्या सोलापूर जिल्हयात देखिल कोरोनारूग्ण आढळून आलेले आहेत. ही बाब विचारात घेता मंदिरे समितीने श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर दि.१७ मे पर्यंत भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

मात्र, श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर हे महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील लाखो भाविकांच्या भावनेशी संबंधित आहेत. त्यामुळे श्रीचे नित्योपचार अत्यंत काटेकोरपणे, वेळच्या वेळी, हजारो वर्षाचे प्रथा व परंपरांची सांगड घालून करणे आवश्यक आहे. कामातील त्रुटींमुळे भाविकांच्या श्रध्देला तडा जाणार नाही यासाठी पुरेपर दक्षता घेणे आवश्यक आहे. तसेच वारकरी संप्रदायाचे श्रीच्या नित्योपचारांबरोबर परंपरा यावर कटाक्षाने लक्ष असते ही बाब विचारात घेता, पहाटे होणारी श्रीची काकडा आरती, नित्यपुजा,महानैवेद्य, पोशाख, धुपारती व शेजारती इथेपर्यंतचे सर्व उपचार तसेच सध्या सुरू असलेली चंदन उटी पुजा परंपरेनुसार जो पूजोपचार करण्यात येत आहे. त्याच्या स्वरुपात किंवा तिच्या पध्दतीत कोणत्याही प्रकारचे खंड न पाडता किंवा व्यत्यय न आणता मंदिरात नित्य म्हणजेच दैनंदिन पूजोपचार चालू ठेवण्यात येत आहेत.तसेच इतर सणवार, उत्सव परंपरेनुसार साध्या पध्दतीने साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे.अशी माहिती देण्यात आली आहे.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूरचे सर्व सदस्य यांचेशी विचारविनियम करून एकमताने निर्णय घेतल्यानंतर अध्यक्ष श्री.गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज औसेकर व कार्यकारी अधिकारी श्री.विठ्ठल जोशी यांनी याची माहिती दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here