सावकारी | तरुणावर प्राणघातक हल्ला ; राष्ट्रवादीच्या नगरसेवकासह…

0

सोलापूर येथील व्याजाने घेतलेले पैसे परत न दिल्याच्या कारणावरून तरुणावर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. याबाबत खाजगी सावकार राष्ट्रवादीच्या नगर सेवकांसह पाच जणांविरुद्ध सलगर वस्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत प्रवीण सिद्राम जाधव (वय 20 रा. न्यू हायस्कूलजवळ सलगरवाडी) यांच्या फिर्यादीवरून तन्मेश गायकवाड, तेजस गायकवाड, प्रेम नागेश गायकवाड, नगरसेवक किसन जाधव, शुभम गायकवाड (सर्व रा. सोलापूर) यांच्याविरूद्ध प्राणघातक हल्ला व सावकारी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादीने सहा महिन्यांपूर्वी आईच्या साडी विक्री व्यवसायाकरिता नगरसेवक किसन जाधव यांच्याकडून 50 हजार रुपये दहा टक्के प्रति महिना व्याजदराने घेतले होते; परंतु लॉकडाउन लागल्यामुळे साडी विक्री व्यवसाय झाला नाही. त्यामुळे फिर्यादीस नगरसेवक जाधव यांचे पैसे देता आले नाही. 16 ऑगस्ट रोजी मावशी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असल्याने फिर्यादी हा त्यांना पाहण्यासाठी गेला होता. त्यावेळी जाधव यांची पत्नी त्या दवाखान्यात ऍडमिट असल्याने ते देखील येथे आले होते.तेव्हा त्यांनी घेतलेले 50 हजार रुपये व व्याज असे एकूण दोन लाख रुपये कधी देणार अशी विचारणा फिर्यादीस केली.फिर्यादीने लॉकडाउन मुळे साडी विक्रीचा व्यवसाय बंद असल्याने आपल्याकडे पैसे नाहीत. थोड्याच दिवसात पैसे जमा करून देतो,असे सांगितले. त्यावेळी आरोपीने त्यास दमदाटी केली. त्यानंतर फिर्यादी व त्याचा मित्र अण्णासाहेब पाटील प्रशालेजवळ हे एका रिक्षा मध्ये बसले असताना जाधव यांच्या सांगण्यावरून अन्य चौघे आरोपी तिथे आले आणि त्यांनी लोखंडी रॉड , हॉकी स्टिक व बॅट ने फिर्यादीवरून प्राणघातक हल्ला केला. त्यात तो जखमी झाला आहे.अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. डी. भुसनूर हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here