जाणून घ्या : सोलापुरातील भुईकोट किल्ला…

0

 

आपल्या सोलापुरातील एक पुरातन वैभव  भुईकोट किल्ला

तज्ज्ञांच्या माहिती नुसार सोलापूरचा किल्‍ला हा श्रीकांत यांनी १७१९ साली आपल्या प्रज्ञा साठी बांधला. काहींच्या मते हिंदू राजांच्या काळात बांधलेल्या या किल्ल्याभोवती महमूद गावान याने दुसरी तटबंदी बाहेरून बांधून किल्ला अभेद्य केला. महमूद गावान हा बहमनी सुलतान महंमदशाह याचा दिवाण होता.

इतिहासातील अनेक घटनांचा साक्षीदार असलेला सोलापूरचा किल्ल्या अनेक राजवटीचे आश्रय स्थान होता. या ऐतिहासिक घटनांमध्ये एक गमतीशीर मजाही आहे. ती म्हणजे ‘सोलापूरचा किल्ल्‍ला’ हा लग्नामध्ये हुंडा म्हणून दिल्याची नोंद आहे.ही नोंद एकदा नाही तर दोन वेळा आहे.

अहमदनगर येथे निजामशाह गादीवर होता. तर, विजापूर येथे इस्माईल आदिलशहा सत्तेवर होता. त्यांच्यामध्ये सलोख्याचे संबंध प्रस्थापित झाले होते. हे संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने एक विवाह संबंध घडवून आणण्यात आला. आदिलशहाच्या कन्येला बुऱ्हाण निजामशहाला देऊन हा लग्नसमारंभ धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. हा विवाह सोलापूरच्या किल्ल्यामध्ये झाला. त्यावेळी म्हणजे, इ.स. १५२३ मध्ये हा किल्‍ला विजापूरच्या ताब्यात होता. जावयाला हुंडा म्हणून ‘सोलापूरचा किल्‍ला’ देण्याचे आदिलशहाने जाहीर केले होते.] पण विवाहानंतर आदिलशहाने हा किल्‍ला देण्याचे नाकारले. त्यातून पुढे निजामशहा आणि आदिलशहा यांच्यात युद्धही झाले. या युद्धात जावई निजामशहाचा पराभव झाला. दुसऱ्यावेळी इ.स. १५५२ मध्ये अहमदनगरची राजकन्या चांदबिबी अली आदिलशहाला देण्यात आली. तर अली आदिलशहाची बहीण हदिया सुलताना हिचा विवाह मुतर्जा निजामशहाशी करण्यात आला. तेव्हा मात्र कबूल केल्याप्रमाणे निजामशहाने हा किल्‍ला विजापूरच्या सुलतानाला हुंडा म्हणून दिला.

सोलापूरचा किल्‍ला बहमनी, आदिलशाही,निजामशाही नंतर मोगल सत्तेत आला. औरंगजेबाच्या कारकिर्दीत त्याचा बराच काळ या किल्ल्याच्या परिसरात गेला. पुढे हैदराबादच्या निजामाच्या आणि नंतर मराठ्यांच्या ताब्यात हा किल्‍ला गेला.

 

किल्ला निश्‍चित केव्हा बांधला याबद्दल मतमतांतरे आहेत. कँपबेल यांच्या मते १३५८ ते ७५, डॉ.हंटर म्हणतात १३४५ तर सरकारच्या पुराणवस्तू संशोधन खात्याच्या मते आदिलशाही बादशहा अली यांच्या कारकीर्दीत १५७८ ला बांधला असावा.
■ (पुराणवस्तू संशोधन खात्याचा वार्षिक रिपोर्ट १९१९-२0 नुसार) तोरो यांनी सचित्र महाराष्ट्र पुस्तकात इ.स. १३१३ मध्ये हसन गंगू बहामनी यांनी बांधला. आतील कोट हिंदू राजांनी इ.स.१२व्या शतकात बांधला असे नमूद केले आहे.
■ किल्यात एकेकाळी ३00घरे होती.मात्र पूर्वीच्या बहुतेक इमारती पडून गेल्या.
■ किल्ला बांधताना बुरुज ढासळू लागल्याने लिंगायत गरोदर स्त्रीचा बळी दिला.या बलिदानाबद्दल जा घराण्याकडे गावची पाटीलकी देण्यात आली, असे मुंबई गॅझेटियने नमूद केले आहे.

संकलन – किशोर चव्हाण  सर्व छायाचित्रे – चेतन लिगाडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here