लालपरी : आजपासून सोलापुरातील एसटी सेवा सुरू

0

सोलापूर : राज्य परीवहन महामंडळ सोलापूर विभागातील ९ डेपोमधून एसटी सेवा सुरू आज सोमवारपासून  सुरू झाली आहे़ , प्रत्येक  आगारातून गाड्या सोडण्यात येत आहे़ पण प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे.

प्रवाशांच्या सेवेसाठी नेहमी तत्पर असणारी एसटी सेवा पुन्हा हळूहळू पुर्वपदावर येत आहे.  सोमवारपासून सोलापूर विभागातील नऊ आगारातून एसटी गाड्या धावण्यास सुरूवात झाली आहे़ .यासाठी त्या सर्व नियोजित आगारांनी तशी व्यवस्था ही केलीय . प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन आवश्यकता लागल्यास जादा एसटी गाड्या सोडण्यात येणार आहेत. याबाबत सर्व अधिकार स्थानक प्रमूखांना आहेत. याबाबतचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे.
आज सोमवारी सोलापूर आगारातून सकाळ पासून आठ गाड्या धावल्या असुन पंढरपुर, बार्शी, अक्कलकोट, खानापुर या मार्गावर गाड्या सोडण्यात आल्या.
२२ मे रोजी सोलापूर विभागातील आठ आगारातून गाड्या सूरू करण्यात आले होत्या. तेव्हा प्रवाश्यांअभावी काही भागात गाड्या रद्द करण्यात आल्या तर काही ठिकाणी एक-दोन प्रवाश्यांना घेऊन एसटी गाड्या धावल्या.  हा अनुभव लक्षात घेता एसटी प्रशासनाच्यावतीने सोमवारी मोजक्याच गाड्यांचे नियोजन केले आहे.या सेेवेस चांगला प्रतिसाद दिला तर जादा एसटी गाड्यास सोडण्यात येणार आहेत.

शासनाने दिलेल्या सर्व सुचना पाळून एसटी प्रशासनाच्यावतीने सोमवारी एसटी सेवा सूरू करण्यात आली आहे़  यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना विविध सुचनाही देण्यात आले आहेत़ याच बरोबर प्रवाशांनीही काळजी घेऊनच प्रवास करावा़
रमाकांत गायकवाड, विभाग नियंत्रक

एका वेळी २२ प्रवाशांनाच करता येणार प्रवास…
प्रत्येक एसटीमध्ये जास्ती जास्त बावीस प्रवाशांनाच प्रवास करता येणार आहे़ याच बरोबर एका सिटवर एका प्रवाशांना बसता येणार आहे. चालकाच्या हाती गाडी देताना पुर्ण सॅनिटायझर करून देण्यात येणार आहे़ याचबरोबर प्रत्येक फेºयानंतर गाडी स्वच्छ केले जाणार आहे़ याच बरोबर सर्व सवलतीचे पास बंद असणार आहेत. जेष्ठ नागरीक, दहा वर्षाच्या आतील मुले यांना प्रवास करता येणार नाही़

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here