सोलापूर -येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक श्री. प्रमोद साठे यांच्या संकल्पनेतून सोलापुरात विजापूर रोडपासून अवघ्या २ मिनिटांच्या अंतरावर राजस्व नगर लगत स्पॅनिश बांधकाम शैलीत सुमारे १४ एकरमधील भव्य प्रोजेक्ट रविवार दिनांक २८ ऑगस्टला लॉन्च होतोय.अशी माहिती गुरुवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली.
पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक, मगरपट्टा सिटी तसेच नांदेड सिटीचे सर्वेसर्वा श्री. सतीश मगर यांच्या अध्यक्षतेखाली, सोलापूरचे आमदार श्री. सुभाष देशमुख यांच्या हस्ते रविवार दिनांक २८ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता इंडो- स्पॅनिश नगरीचे उदघाटन होईल.
याप्रसंगी विशेष उपस्थिती म्हणून माननीय आमदार श्री. समाधान आवताडे, आमदार श्री. संजय शिंदे, आमदार श्री. सचिन कल्याणशेट्टी, आयुक्त सोलापूर शहर श्री. पी. शिवशंकर, माजी आमदार श्री. राजन पाटील, माजी अध्यक्ष जिल्हा परिषद सोलापूर श्री. बळीराम काका साठे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून वेंकटेश बिल्डकॉनचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. अंकुश आसबे, क्रेडाई अध्यक्ष महाराष्ट्र श्री. सुनील फुरडे, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष श्री. दत्ता मामा मुळे, भाजप शहराध्यक्ष श्री. विक्रम देशमुख, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्री. शहाजी पवार, माजी महापौर महेश आण्णा कोठे,माजी विरोधी पक्षनेते श्री. अमोल बापू शिंदे, माजी गटनेते व सभापती श्री. चेतन नरोटे या सर्व नामवंतांची उपस्थिती राहील.
सोलापुरात स्पेन का आणावं वाटलं?
श्री प्रमोद साठे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं की, मी मूळचा वडाळ्याचा असून आजपर्यंत सोलापूर आणि पुण्यामध्ये बांधकाम व्यावसायिक म्हणून अनेक दर्जेदार प्रोजेक्ट्स केले तसेच पुणे व गोवा येथे काही वेगळ्या शैलीतील प्रकल्प आम्ही सुरु करणार आहोत पण प्रत्येकाची नाळ ही आपल्या मातीशी जोडलेली असते आणि आपल्या जन्मभूमीत काहीतरी दर्जेदार करावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. आजपर्यंत प्रकल्प करत असताना भविष्यात काय केलं जाईल हे सांगून प्रकल्प विकले जात होते पण आम्ही तसं न करता आम्ही काय देणार आहोत हे आधी तयार केलं आणि मग आम्ही लोकांना फिजिकली सगळं दाखवून, त्यांची विश्वासार्हता संपादन करून मगच प्रकल्प विकत आहोत. सोलापूरकरांनी एकदा फक्त या प्रोजेक्टला व्हिझिट करावी आणि सोलापूरबद्दलची नकारात्मकता संपवण्यासाठी या प्रोजेक्टचा प्रचार आणि प्रसार करावा एवढंच मी आज सांगेन.
सगळ्याच मोठ्या हस्तींनी केलं प्रोजेक्टचं कौतुक
, ज्येष्ठ अभिनेते राहुल ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक श्री. नागराज मंजुळे, सिने अभिनेत्री रिंकू राजगुरू, सोलापूरकर, माननीय जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सोलापूर पोलीस अधीक्षक ग्रामीण श्रीमती तेजस्विनी सातपुते, अतिरिक्त आयुक्त सोलापूर महानगर पालिका श्री. विजय खोराटे, पोलीस उपायुक्त सोलापूर शहर डॉ. वैशाली कडुकर, त्याचबरोबर जगविख्यात मूर्तिकार श्री. भगवान रामपुरे व सोलापूरचे ब्रँड अँबेसिडर व प्रसिद्ध उद्योजक श्री. राम रेड्डी तसेच सोलापूर जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक विविधं क्षेत्रातील नामवंतांनी या प्रोजेक्टला भेट दिली असून या सर्व दिग्गज लोकांचे गौरव उद्गार आपणांस वॉल ऑफ फेमच्या माध्यमातून प्रोजेक्टच्या क्लब हाऊसमध्ये वाचावयांस मिळतील.
सदर पत्रकार परिषदेस प्रकल्पाचे सर्वेसर्वा श्री. प्रमोद साठे, संचालक श्री. आकाश साठे व श्री. अनीश सहस्रबुद्धे हे उपस्थित होते.
स्पॅनिश स्टाईल घरांनी सजणारा आणि लॉन्चिंगच्या वेळेसच ४० पेक्षा जास्त ऍमेनिटीज देणारा प्रोजेक्ट म्हणून एक वेगळी संकल्पना साकारलेली आहे. १ एकर परिसरात असलेल्या सर्व अत्याधुनिक ऍमेनिटीज लॉचिंगपूर्वीच पूर्ण करून अंदाजे ८५०० पेक्षा जास्त प्लांटेशन सोलापूरकरांना अनुभवता येईल हे विशेष.