ब्रेकिंग | सोलापुरातील शिक्षणाधिकाऱ्यास लाच प्रकरणी अटक

0

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेतील प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना लाच घेतल्या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी सायंकाळी ताब्यात घेतले आहे.ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले प्रकरणी त्यांनी केलेल्या कारवाईमुळे लोहार मोठ्या चर्चेत आले होते.

शासकीय काम करण्यासाठी जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी पैशांची मागणी केली. तक्रारदार व्यक्ती आणि शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यात तडजोडी झाली. त्यानंतर लोहार यांनी पंचवीस हजार रुपये स्वीकारल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

तक्रार आल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी सायंकाळी सोलापूर जिल्हा परिषदेत सापळा लावला होता. तक्रारदार व्यक्तीकडून 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना रंगेहात पकडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here