खऱ्या अर्थाने जुळे सोलापूरवासियाने लुटले ‘सोने’ : उपमहापौर राजेश काळे

0

जुळे सोलापुरातील महात्मा बसवेश्वर उद्यान विकासित करून खऱ्या अर्थाने जुळे सोलापूर वासियाने विजयादशमी शुभ मुहूर्तावर सोने लुटले : उपमहापौर राजेश काळे

सोलापूर : जुळे सोलापूरातील वसुंधरा महाविद्यालयासमोरील मोकळ्या जागेत महात्मा बसवेश्वर यांच्या नावाने भव्य असे उद्यान उभारण्यात येणार आहे,त्याच्या विकासासाठी भरीव निधी देणार असल्याचे खा.डाॅ.जय सिध्देश्वर महाराज यांनी जाहीर केले.
या उद्यानाचे विजयादशमीच्या मुहूर्तावर मोठ्या थाटात भूमिपूजन झाले. या उद्यानाचे भूमिपूजन खा.डाॅ.जयसिध्देश्वर महाराजयांच्या हस्ते झाले.यावेळी होटगी मठाचे डाॅ.मल्लिकार्जून शिवाचार्य महाराज,आमदार सुभाष बापू देशमुख, माजी आ.शिवशरण अण्णा पाटील, उपमहापौर राजेश काळे,सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा.डाॅ.इरेश स्वामी, सिद्धेश्वर मंदिराचे मानकरी राजशेखर हिरेहबू,श्रमिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे,डाॅ.बसवराज बगले,लिंगायत समन्वय समितीचे महासचिव विजयकुमार हत्तुरे हे प्रमुख पाहूणे उपस्थित होते.
यावेळी *उपमहापौर राजेश काळे यांनी स्वागत व प्रास्ताविक करून
आगामी दोन महिन्यात या उदयानाची निर्मिती करणार असे सांगितले,त्यानंतर विजयकुमार हत्तुरे यांनी उपमहापौर राजेश काळे यांचे लिंगायत समाजाच्या वतीने अभिनंदन केले. होटगी मठाचे डाॅ.मल्लिकार्जून शिवाचार्य यांनी या उद्यानाचे कौतुक करून मंगळवेढा येथील स्मारकासाठी खासदारांनी लक्ष घालावे अशी मागणी केली. तर आ.सुभाष देशमुख यांनी, जुळे सोलापुरात राजेश काळे यांनी भरपूर निधी आणून विकास कामे करावे.अशी सूचना यावेळी बोलताना केली.
जनता बँकेचे संचालक महेश अंदेली,आनंद मुस्तारे रेवणसिद्ध आवजे,हुलसुरे ,नगर अभियंता संदीप कारंजे आय एम एस शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा.ए. डी.जोशी, व्ही व्ही पी पॉलिटेक्निक कॉलेज चे संस्थापक अध्यक्ष प्रा. जी के देशमुख विश्वनाथ शेगावकर,अरविंद भडोळे, टी.बी.जाधव,मल्लिनाथ आकळवाडी उपस्थित होते.


महात्मा बसवेश्वर उद्यान विकास समितीचे प्रदीप तडकल,दयानंद भिमदे, सकलेश बाभळगावकर ,संतोष केंगनाळकर,राजू कुराडे,संजय जम्मा,सौ.विनया ढेकळे,सौ.संपदा जोशी, शोभा स्वामी रविश्वनाथ आमणे,अनिल उपरे,गणराज पाटील,नागेश पडणूरे,राजू वनकोरे हे हजर होते.शीतल जालिमिंचे आणि सौ.तडकल यांनी सूत्रसंचालन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here