MH 13 News Network
सोलापूर, दि. 3 – दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिनाचे औचित्य साधून सोलापूर श्रमिक पत्रकार संघ व
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्याशी संलग्न क्राईम रिपोर्टर संघटनेच्यावतीने दैनिक व चॅनलचे पत्रकार, छायाचित्रकारांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांच्या हस्ते हा समारंभ महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या कार्यालयात पार पडला. यावेळी शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष मनीष केत, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे व क्राईम रिपोर्टर संघटनेचे अध्यक्ष अनिल कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी क्राईम रिपोर्टर संघटनेच्या पदाधिकारी व सभासदांचे मोबाईल क्रमांक असलेल्या यादीचे प्रकाशन पोलीस आयुक्त डॉ. माने यांच्या हस्ते करण्यात आले.
सुरुवातीला श्री विठ्ठलाची मूर्ती भेट देऊन पोलीस आयुक्त माने यांचे स्वागत मनीष केत व विक्रम खेलबुडे यांनी तर पोलीस निरीक्षक दोरगे यांचे स्वागत अनिल कदम यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनीष केत यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डाँ. ज्योती वाघमारे यांनी केले तर आभार अनिल कदम यांनी मानले.
कार्यक्रमास क्राईम रिपोर्टर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय मोरे, मार्गदर्शक अकलाख शेख, सचिव अमोल व्यवहारे, उपाध्यक्ष अरुण रोटे, तात्या लांडगे, रुपेश हेळवे, खजिनदार भरतकुमार मोरे, सहचिटणीस रजनीकांत उपलंची यांच्यासह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.