BREAKING: शरद पवार, उद्धव ठाकरे – संयुक्त पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे

0

MH13 NEWS NETWORK:

शरद पवारांनी व्यक्त केलेलं मत :

 • महाविकास आघाडीचे सरकार बनवण्यासाठी आम्ही तयार होतो
 • अजित पवारांचा निर्णय राष्ट्रवादीच्या विरुद्ध
 • जर काही आमदार फुटून गेले तर त्यांचा पराभव करू
 • सोबत गेलेल्या आमदारांना पक्षांतर बंदी कायद्याची जाणीव आहे आणि ती असून ते तिथे गेले आहेत
 • १०-११ सदस्य अजित पवारांसोबत होते, त्यातील काही सदस्यांनी आपल्याशी संपर्क साधला आहे
 • भाजपाला पाठिंबा देणे हे राष्ट्रवादीच्या कोणत्याच कार्यकर्त्याला पटणारे नाही
 • सामान्य माणूस, पक्षाचा कार्यकर्ता अजित पवारांसोबत नाही
 • भाजपाला बहुमत सिद्ध करता येणार नाही
 • लवकरच महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करू
 • कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांची तयारी
 • नवीन विधिमंडळ नेता निवडीसाठी आज ४.३० वाजता राष्ट्रवादीची बैठक
 • मी अशा प्रसंगातून याआधीही गेलोय
 • अजित पवारांनी सोबत घेतलेल्या सर्व आमदारांना अंधारात ठेवले, कल्पना नाही दिली – आमदार संदीप क्षीरसागर

उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलेलं मत:

 • अजित पवारांनी पाठीत वार करायला नको होता
 • भाजपची कामकाज पद्धती म्हणजे रात्रीस खेळ चाले
 • शिवरायांच्या महाराष्ट्रावर खंजीर खुपसण्याचा सर्जिकल स्ट्राईक केला
 • हेच का भाजपचं नवं हिंदुत्व?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here