जनता बँक निवडणूकीसाठी परिवार पॅनलच्या उमेदवारांची घोषणा

0

सोलापूर जनता सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी परिवार पॅनलच्या उमेदवारांची घोषणा पॅनल प्रमुख किशोर देशपांडे यांनी सोमवारी बैठकीत केली. या बैठकीस डॉ. सतीश वळसंगकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

बँकेच्या २०२० -२१ ते २०२५ -२०२६ या वर्षांसाठी १७ जागांसाठी १४ मार्च रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी परिवार पॅनलमधून विद्यमान संचालक वरदराज बंग, ऍड. प्रदीपसिंह राजपूत, प्राचार्य गजानन धरणे, सी. ए. सुहास श्रीगोंदेकर, मुकुंद कुलकर्णी (बार्शी), महिला प्रवर्गातून डॉ. किरण पाठक यांना संधी देण्यात आली असून इतरांमध्ये पुरुषोत्तम उडता, जगदीश भुतडा, सुनिल पेंडसे, गिरीश बोरगांवकर, आनंद कुलकर्णी, राजेश पवार, विनोद कुचेरीया (लातूर), मिलिंद कुलकर्णी (माळशिरस), अनुसूचित जाती प्रवर्गातून रवींद्र साळे (पंढरपूर), दत्तात्रय कुलकर्णी (उस्मानाबाद), महिला प्रवर्गातून चंद्रिका चौहान यांचा समावेश आहे.

अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ७७ अर्ज होते. यातील २८ जणांनी अर्ज मागे घेतल्याने आता ४४ जण रिंगणात आहेत.

यावेळी पॅनल प्रमुख किशोर देशपांडे म्हणाले, सोलापूर जनता सहकारी बँकेच्या सभासदांनी बँकेच्या उन्नतीसाठी परिवार पॅनलच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावे.

यावेळी बैठकीस रा. स्व. संघाचे जिल्हा कार्यवाह संतोष कुलकर्णी, निलेश भंडारी, अशोक संकलेचा, सुहास जोशी, प्रा.देवानंद चिलवंत, नरेंद्र काळे, धनंजय कुलकर्णी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here