गर्दी नकोच : ‘जनधन’चे मानधन जमा ; आज खाते क्रमांक ‘0 ते 1’ चे होणार वाटप

0

महेश हणमे  9890440480 

देशात लॉक डाऊन झाल्यानंतर सामान्य गरीब कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी जनधन खातेधारक महिलांना पाचशे रुपयांचे मानधन देणे सुरू झाले .त्या रकमेचा दुसरा हप्ता म्हणजेच या मे महिन्याचा बँकेमध्ये जमा झाला आहे. परंतु गर्दी होऊ नये यासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयाने नियोजन केले आहे. खाते क्रमांकाच्या शेवटच्या आकड्यांनुसार वाटपाच्या तारखा निश्चित करण्यात आल्या. त्या ठरलेल्या तारखेलाच ग्राहकांनी बँकेत जावे असे आवाहन करण्यात आलं आहे.

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतून हे मानधन देण्यास सुरुवात झाली. दरमहा 500 रुपयांप्रमाणे तीन महिने देण्याचे ठरलेले आहे. त्यानुसार मे महिन्यातील मानधन केंद्राने बँकेकडे जमा केले. मागील महिन्यातील मानधन वाटप वेळी बँक ग्राहकांनी नियोजन समजून न घेतल्याने ‘फिजिकल डिस्टन्स’ चा फज्जा उडाला होता.यावेळी तसे होऊ नये म्हणून आम्ही पूर्वसूचना दिली आहे असं ही बँकेच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

बँक खाते क्रमांक च्या शेवटच्या आकड्यानुसार तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.आज पासून त्यांचे वाटप सुरू होईल.

असे आहे वाटप नियोजन
खाते क्रमांकातील शेवटच्या आकड्यांनुसार वाटपाचा तारखा ठरवण्यात आल्या आहेत.आज 4 मे पासून त्याचे वाटप सुरू होईल. 11 मे पर्यंत त्यांचे वेळापत्रक याप्रमाणे राहील.

खाते क्रमांक  0 ते 1  वाटप तारीख 4 मे
खाते क्रमांक  2 ते 3   तारीख 5 मे
खाते क्रमांक   4 ते 5  तारीख 6 मे
खाते क्रमांक   6 ते 7  तारीख 8 मे
खाते क्रमांक   8 ते 9   तारीख 11 मे

सात मे रोजी बुद्ध पौर्णिमा असल्याने बँकांना सुट्टी राहील

संचार बंदी असली तरी एटीएम मध्ये मुबलक पैसे
आहेत सर्व एटीएम केंद्रांमध्ये मुबलक पैसे ठेवण्याची व्यवस्था रोजच्या रोज होत असते. त्यासाठी पोलीस खात्याने परवानगी दिली आहे. फक्त प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या ठिकाणच्या एटीएम मध्ये जाता येत नसल्याने तेथील एकच केंद्र बंद असल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

अफवांवर विश्वास ठेवू नका गर्दी करूच नका
जनधन खातेधारकांचे एकदा जमा झालेले पैसे केंद्राकडे परत जाणार नाहीत. अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये. ठरलेल्या तारखांनाच बँकेच्या शाखेत जा. फिजिकल डिस्टन्स ठेवा, मास्क वापरा.

भारतीय बँक असोसिएशनने (आयबीए) जाहीर केले आहे की बँका केवळ रोख ठेव आणि पैसे काढणे, चेक क्लिअरन्स, NEFT/ RTGS आणि सरकारी व्यवहार यासारख्या अत्यावश्यक सेवा पुरविल्या जातील. जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त कार्यालयाशी चर्चेनुसार (दोन्ही विभागांचे आदेश रात्री उशिरा प्राप्त झाले ). आज ४ मे २०२० पासून बँकिंगची वेळ लॉकडाऊन कालावधीपर्यंत सकाळी 8 ते दुपारी 12 अशी असेल. आमच्या ग्राहकांना सर्व बँकिंग सेवा पुरविल्या जातील कोविड १९ साठी सर्व सावधगिरी बाळगणे आवश्यक (विशेषतः सामाजिक अंतर राखणे) मास्क आणि सानिटायझरचा वापर करणे.
हेमंत महाजन
उपविभागीय व्यवस्थापक,बँक ऑफ महाराष्ट्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here