आयपीएल सट्टा बाजार बोल्ड होणार ? बीडर,बुकी,कॅप्टन, प्लेअर…आया,लगाया,लंबी..!

0

विशेष प्रतिनिधी

आयपीएल सट्टा बाजार ‘बोल्ड’ कधी होणार ? यावर MH 13 News सोलापूरकरांच्या मनातील अपेक्षा व्यक्त करीत आहे . शहर परिसरातील तरुणाई या मायाजालात अडकू नये, संसार देशोधडीला लागू नये , माय भगिनींचे तळतळाट ,आत्महत्या थांबण्यासाठी पोलिस कधी चाप लावणार अशी चर्चा सुरू आहे..आज रविवारी सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार आहे.त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बेटिंग होऊ शकते

प्रत्येक मॅच वेळी करोडोंची होणारी उलाढाल, प्रत्येक चेंडू गणिक टॉस पासून बदलणारे गणित गेम,आया,लगाया,लंबी,बीडर,बुकी,प्लेअर या साडेसातीच्या फेऱ्यातून पोलीस प्रशासनाने सोलापुरातील फसलेल्या आणि अडकू पाहणाऱ्या नागरिकांची सुटका करावी. बड्या- बड्या धेंडांना अटक करावी. त्यांच्यावर कायद्याचा अंकुश रोवण्याची वाट अनेकजण बघत आहेत.

शेखी मिरवणारा गरम सूप पिऊन कॅप्टन टीमचे नेतृत्व करतो .गरिबांची घरकुल कधी वाचणार हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नो मॅन कॅन विन विदाऊट मी म्हणणारा वेशीत बसून प्लेयर फिरवतो. मान ना मान तू मेरा मेहमान म्हणणारा कॅप्टन ,तर पेठेत बसून खुलेआम छक्के -चौका यांची बरसात करणारा गंगेत कधी वाहून जाणार याची सोलापूरकर वाट बघत आहेत. मटक्याच्या किंग गेला आता आयपीएलचा मेंबर कधी थांबणार ?? याचीच चर्चा सुरू झाली आहे.

पोलिसांच्या एका पथकाने दोन डझनहून अधिक जणांना ताब्यात घेतले आहे..पण याविषयी सविस्तर माहिती मिळाली नाही. परंतु करारी व धडाकेबाज पोलीस आयुक्त नक्कीच या धंद्याचे हि कंबरडे मोडतील याची आशा सोलापूरकर करत आहेत.

आयपीएल सट्टा बाबत पोलीस प्रशासनाने केलेल्या धडक मोहीमेसंदर्भात ‘एम एच 13 न्यूज’ने पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की,याबाबत तपास चालू आहे.लवकरच चित्र स्पष्ट होईल .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here