दावोस येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कंपन्यांसमवेत सामंजस्य करार होत असून पहिल्याच दिवशी महाराष्ट्र राज्यामध्ये सुमारे ४५९०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. आज 17 जानेवारी रोजी सकाळी उद्योग मंत्री उदय सावंत यांनी ही माहिती दिली.
या सामंजस करारामुळे राज्य सरकारची प्रतिमा उंचावत असून मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक झाल्याने बाजारपेठेत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
डाव्होस येथील ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी मुख्यमंत्री स्वित्झर्लंडला पोहोचले आहेत.
#TodaysNews
#MahaGovtNews #Davos23