निराळे वस्ती | वाढवला जातोय विश्वास ; १०३ नागरीकांची रॅपिड Antigen टेस्ट

0

संजय हरिजन /सोलापूर 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने पसरत असताना त्यास अटकाव करण्यासाठी शहर परिसरात लॉक डाऊन सुरू आहे. या काळात अधिकाधिक टेस्टिंग होऊन वेळेच गरजूंना वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. यास नगरसेवकांचा प्रतिसाद मिळतो आहे. देवेंद्र कोठे यांनी आज प्रभागातील लोकांमध्ये विषाणूची भीती घालवून त्यांची रॅपिड अन्टीजन टेस्ट घेण्यात आली.

गुरुवारी प्रभाग क्रमांक सात येथे सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने रॅपिड टेस्ट शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. निराळे वस्ती येथील विठ्ठल मंदिर येथे १०३ नागरिकांची तपासणी करण्यात आली.या शिबिरात देगाव यु.पी एच.सी सेंटरच्या डॉ.सायली शेंडगे व त्यांच्या टीमने नागरिकांची तपासणी केली. या प्रसंगी नगरसेवक देवेंद्र दादा कोठे,माजी परिवहन सभापती तुकाराम नाना मस्के यांची उपस्थिती होती.

शिबिर यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर शिंदे ,योगेश संत,बापू पवार,शैलेश मोरे, मनोज भैय्या मस्के, अजय मस्के ,शंकर सरवदे काका,सिद्धू ढोबळे ,विलास घाडगे,संतोष सुरवसे, लखन पवार तसेच प्रभाग ७ चे प्रतिनिधी किरण भैय्या पवार, बाबा शेख ,राहुल गोयल ,अक्षय आयवळे यांनी परिश्रम घेतले
आज पर्यंत घेतलेल्या टेस्ट

२१-७-२० रोजी ६१ धरमशी लाईन

२२-७-२० रोजी ४२ जुनी पोलीस लाईन

२३-७-२० रोजी १०३ निराळे वस्ती

शहर परिसरातील अनेक नागरिक भीतीपोटी टेस्ट करून घेण्यासाठी तयार नाहीत. यासाठी त्यांच्या मनात विश्वास आणि आधार निर्माण करणे गरजेचे आहे. प्रभाग माझे कुटुंब आहे.त्यातील सदस्यांची काळजी घेणे. त्यांच्यात विश्वास निर्माण करून आरोग्यासाठी सर्व सुविधा पुरवणे ,हे मी माझे कर्तव्य करत आहे. त्यांच्यात विश्वास निर्माण करण्यासाठी मी स्वतः ची टेस्ट करून घेतली.
देवेंद्र कोठे ,नगरसेवक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here