प्रिसिजन संगीत महोत्सवाचे थाटात उद्घाटन

0

सोलापूर – प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीने हुतात्मा स्मृती मंदिर सभाग्रहात संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी या महोत्सवाचे थाटात उद्घाटन झाले पहिल्या सत्रात प्रख्यात संतूर वादक पंडित दिलीप काळे यांच्या संतूर वादनाने व दुसऱ्या सत्रात रघुनंदन पणशीकर यांच्या शास्त्रीय गायनाने सोलापूरकर मंत्रमुग्ध झाले.

प्रिसिजन संगीत महोत्सवाचे हे सातवे वर्ष आहे. या महोत्सवाचे उद्घाटन प्रिसिजन उद्योग समूहाचे चेअरमन यतीन शहा प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ सुहासनी शहा,कार्यकारी संचालक करण शहा, मयुरा शहा व संतूरवादक पंडित दिलीप काळे व प्रसिद्ध तबलावादक रामदास पळसुले यांच्या हस्ते संपन्न झाले. उद्घाटनानंतर संतूरवादक काळे यांचा करण शहा व तबला वादक रामदास पळसुले यांचा मयुरा शहा यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व पुस्तक भेट देऊन सन्मान करण्यात आला.

शास्त्रीय संगीताच्या पहिल्या सत्रात संतूर वादक पंडित दिलीप काळे यांनी हंसध्वनी राग सादर केला. त्यांना रामदास पळसुले यांनी तबल्यावर साथ दिली दरम्यान काळे आणि पळसुले यांच्या जुगलबंदीने सोलापूरकर मंत्रमुग्ध झाले टाळ्यांच्या कडकडात सोलापुर करानी त्यांना साथ दिली.यावेळी जोडझाला व रुपक झपताल हे राग या जुगलबंदीत सादर करण्यात आले.

दुसऱ्या सत्रात पंडित रघुनंदन पणशीकर यांचे शास्त्रीय गायन संपन्न झाले त्यांना तबल्यावर भरत कामत यांनी व हार्मोनियम सुयोग कुंडलकर, पखवाज प्रसाद जोशी व तालवाद्यावर नागेश भोसेकर यांनी साथ दिली. रघुनंदन पणशीकर यांनी रागेश्री मध्ये विलंबित तीनताल, द्रुत एकतालात “देखो शाम मोरी बैय्या मरोडी” ही बंदिश सादर केली. नंतर “बाजे रे मुरलीया बाजे” हे हिंदी आणि “तुंगा तीरदी निंता दी यती वरू, हेळ मैय्या” हे भीमसेनजींनी गायिलेले कन्नड भजन सादर केले. “बोलावा विठ्ठल या अभंगांने तर संपूर्ण वातावरण विठ्ठलमय झाले.
पंडित दिलीप काळे यांनी केलेले संतूर वादन व पंडित रघुनंदन पणशीकर यांनी केलेले शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनाने रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले. या कार्यक्रमास पोलीस आयुक्त हरीश बैजल सहपत्नी व पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्यासह शेकडो रसिक श्नोते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here