कोरोनामुक्त 4622 | शहरात आज ‘निगेटिव्ह’ 1589 तर 95 ‘पॉझिटिव्ह’ ;1 जणांचा मृत्यू

0

MH 13 News Network

सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज गुरूवारी दुपारी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री 12 पर्यंत 1684 वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी 1589 अहवाल निगेटिव्ह आले असून 95 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात 72 पुरुष तर 23 महिलांचा समावेश असल्याची माहिती सोलापूर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.आज 29 बाधित व्यक्ती बऱ्या होऊन घरी गेल्या आहेत.

ज्या वेगाने सोलापूर शहर आणि परिसर बाधित रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. त्याच प्रमाणे मृत्यूचे कमी होताना दिसत आहे.आज मात्र नवीन 95 रुग्ण आढळले आहेत .मोठ्या प्रमाणावर
शहर परिसरात कोरोना टेस्ट करण्याचे प्रभाग निहाय नियोजन करण्यात आलेले आहे. त्यानुसार टेस्टिंग होत आहे परंतु, अजूनही कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि तपासणी प्रमाण वाढवणे गरजेचे आहे.जेणेकरून, कोरोनाची साखळी तोडण्यात सोलापूरकर यशस्वी होतील.

आज 1 कोरोना बाधित व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

आज पर्यंत एकूण 395 जणांचा बळी या आजाराने गेला आहे. यामध्ये 265 पुरुष तर 130 महिलांचा समावेश होतो.

आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 6188 इतकी झाली आहे, तर आजपर्यंत एकूण 395 जणांचा मृत्यू झाला आहे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1171 इतकी आहे, तर रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 4622 इतकी लक्षणीय आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here