जनतेला परवडणारी जनश्री विमा योजना तातडीने चालू करा – आडम मास्तर.

0

BY MH13 NEWS NETWORK : तीन रंगाच्या झेंड्याच्या महाविकास आघाडीच्या सरकारने कामगारांना न्याय देण्याचे अभिवचन महाराष्ट्राच्या जनतेला दिले,त्यांच्या कडे आमची आग्रही मागणी आहे की, 1 जुलै 2016 रोजी सरकारने बंद केलेली जनश्री विमा योजना तातडीने सुरू करा अन्यथा सोलापुरातील 12 हजार जनश्री विमा योजना सभासदांना घेऊन मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारा जनश्री विमा योजना सभासदांच्या मेळाव्यात बोलताना
आडम मास्तर म्हणाले.
लाल बावटा घरेलू कामगार युनियन च्या वतीने बुधवार दिनांक 18 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता दत्त नगर लाल बावटा कार्यालय येथे जनश्री विमा सभासदांचा मेळावा आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान युनियनचे रंगप्पा मरेड्डी यांनी भूषविले.
ते बोलताना पुढे म्हणाले की, जनश्री विमा योजना अंतर्गत सभासदांना 25 कोटी रुपयांचा लाभ घरेलू युनियन च्या माध्यमातून सरकार कडून मिळवून देण्यात आला. आज सरकार सर्व कल्याणकारी योजना चालू ठेवले आणि फक्त जनश्री विमा योजना बंद ठेवले,यासाठी मी तत्कालीन श्रममंत्री दत्तात्रय भंडारू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समक्ष भेटून योजना सुरू करण्याची मागणी केली मात्र त्यांनी याबाबत उदासीनता दर्शवली. या योजनेच्या लाभासाठी जवळजवळ 12 हजार सभासदांनी नियमितपणे भरले त्यांचं काय असा सवाल केले? आता न्यायालयीन लढाई करणार आणि श्रमिकांचा हक्क मिळवणार!
ही योजना अंमलात आणण्यासाठी सरकार पुढे जावे लागेल यासाठी संघर्षाच्या मैदानात उतरण्याची तयारी ठेवा असे आवाहन केले.
प्रास्तविक युवा आघाडीचे जिल्हा सहसचिव दत्ता चव्हाण यांनी केले.व्यासपीठावर लक्ष्मण माळी युवा आघाडीचे जिल्हा सचिव अनिल वासम आदी उपस्थित होते.

यावेळी सिटू चे महासचिव अँड एम एच शेख व युनियनच्या अध्यक्षा माजी नगरसेविका नलिनी कलबुर्गी यांनी मेळाव्याला संबोधीत केले.
सदर मेळावा यशस्वी करण्यासाठी मोहन बडगू,दत्ता पारसवार,रवी गेंट्याल,गोपाळ जकलेर,बालाजी गुंडे,तिमय्या यारोल, विजय मरेड्डी,मल्लिकार्जुन बेलीयर आदीनी परिश्रम घेतले.

पूर्वी जनश्री विमा योजना अशी होती.

1. नैसर्गिक मृत्यू लाभ 30 हजार रुपये
2. अपघाती मृत्यू लाभ 75 हजार रुपये
3. अपघाती अपंगत्व लाभ 37 हजार 500 /-

4. 8 वी ते 12 वी पर्यंत सभासदांच्या पाल्यांना दरवर्षी 1200/- शिष्यवृत्ती लाभ मिळत असे.

5. योजना प्रीमियम
लाभार्थी 50/- + राज्य सरकार चा हिस्सा 100/- + केंद्र सरकार चा हिस्सा 150 /- असे एकूण 300 /- अशी होती.
ही प्रमियम भारतीय आयुर्विमा च्या समूह पेन्शन योजना च्या खात्यात सरकार भरत असे.
ही योजना नोडल एजन्सी मार्फत राबवले जात असे.

सर्व जनश्री विमा योजना सभासदांनी तातडीने याविषयी अधिक माहिती साठी युनियनचे मोहन बडगू यांच्याकडे संपर्क करावे अशी माहिती आडम मास्तर यांनी मेळाव्यात दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here