१२/१ | ‘या’ १२ आमदारांचे निलंबन त्वरित रद्द करा; भाजपाची मागणी

0

भाजपा सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

पावसाळी अधिवेशन – २०२१ रोजी दि.५ जुलै रोजी विधानसभेच्या कामकाजात OBC समाजाच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा भाजपच्या आमदारांनी उचलून धरला, परंतु सभागृह अध्यक्षांनी १० मिनिटांकरिता सभा तहकूब केली त्याच १० मिनिटाच्या काळात हंगामी सभागृह अध्यक्ष शिवसेनेचे भास्कर जाधव यांच्या केबिन बाहेर भाजप व शिवसेना आमदारांमध्ये बाचाबाची झाली. परंतु हंगामी अध्यक्षांनी सेना आमदारांच्या कृत्याकडे कानाडोळा करत फक्त भाजपच्या १२ आमदारांवरच १ वर्षासाठीची निलंबनाची कारवाई केली. या घटनेचा हंगामी अध्यक्षांनी सूडबुद्धीने केलेल्या कारवाईचा भाजपा सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने जाहीर निषध करण्यात आला व सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना निवेदन देण्यात आले.
दडपशाही पद्धतीने भाजपाच्या ज्या १२ आमदार महाविकास सरकारकडून निलंबित करण्यात आलेले आहे ते तात्काळ मागे घेण्यात यावे निलंबन रद्द करावे. अन्यथा रस्त्यावर उतरुन उग्र आंदोलन करण्यात येईल. यास पूर्णपणे महाविकास आघाडी सरकारच जबाबदार असेल असा इशारा भाजपा सोलापूर कडून देण्यात आला.


यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष गणेश भोसले, शहर अध्यक्ष विक्रम देशमुख, महापौर सौ. श्रीकांचना ताई यन्नम, सभागृह नेते शिवानंद पाटील, सरचिटणीस रुद्रेश बोरामणी, नगरसेवक नागेश भोगडे, भाजयुमो प्रदेश कार्यकारणी सदस्य समर्थ बंडे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रकाश घोडके, ओबीसी मोर्चा अध्यक्ष राम वाकसे, सुनील टोणपे, शुभम कुदळे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here