उड्डाणपूल | ताबडतोब मंजुरी पण…आमच्या नाकर्तेपणामुळे काम रखडले -आ. देशमुख यांची स्पष्टोक्ती

0

सोलापूर : सोलापूरचे भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांनी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या समोर सोलापूर शहराच्या दृष्टीने महत्त्वाच्या दोन मागण्या केल्या. यामध्ये विशेष करून शहरातील दोन उड्डाणपूलांचा मुद्दा त्यांनी मांडला हे दोन्ही उड्डाणपूल केंद्राच्या निधीतून करावे अशी महत्वपूर्ण मागणी त्यांनी केली.

आज सोलापुरात केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये कोट्यवधींच्या विकास कामांचे लोकार्पण आणि भूमी पूजन समारंभ पार पडला. त्यावेळी भाजपाचे आमदार तथा माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी मनमोकळेपणे उड्डाणपूल संदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here