वटवृक्ष मंदिर समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

0

गुणवंत गुरुदत्त-वैष्णवी यांचा महेश इंगळेंनी केला सन्मान

(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.२४/६/२२) – मार्च २०२२ मध्ये एसएससी पुणे बोर्डाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत येथील शहाजी प्रशालेचे विद्यार्थी  स्वामीभक्त रामचंद्र समाणे यांचे पुतणे गुरूदत्त बाबू समाणे (९५.२०%) गुण मिळवून श्री शहाजी प्रशालेत तिसरा क्रमांक मिळविल्याबद्दल व वैष्णवी लक्ष्मण समाणे (८९.८०%) उत्कृष्ट गुणांसह उत्तीर्ण झाल्याबद्दल दोन्ही गुणवंत विद्यार्थ्यांचा वटवृक्ष मंदिर समितीच्या वतीने सन्मान झाला.

मंदिर समितीचे चेअरमन नगरसेवक महेश इंगळे यांनी गुरुदत्त व वैष्णवी समाणे यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन सत्कार केला. याप्रसंगी बोलताना महेश इंगळे यांनी गुरुदत्त व वैष्णवी समाणे यांनी दहावीच्या या यशावर हुरळून न जाता बारावीला तसेच पुढील व्यवसायिक शिक्षणात भरघोस यश मिळवून उज्वल यश संपादन करावे, त्याकरिता त्यांच्या पाठीशी श्री स्वामी समर्थांचे आशीर्वाद आमच्या शुभेच्छा असल्याचे गौरवोद्गार काढले. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, प्रफुल जाधव, श्रीशैल गवंडी, रामचंद्र समाणे, गिरीश पवार,संजय पवार, प्रसाद सोनार, सागर गोंडाळ, महादेव तेली, चंद्रकांत कवटगी इत्यादी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here