मोहोळ नगरपरिषदच्यावतीने ‘होम टू होम’ सर्वेक्षण

0

मोहोळ नगर परिषदेच्या वतीने प्रभाग क्र ७ मध्ये होम टु होम सर्वेक्षण केले जात असून त्यातून नागरिकांची माहिती व तपासणी केली जात आहे.नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाचे डॉक्टर व कर्मचारी तत्परतेने काम करत असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.

सध्या कोरोनाचे सोलापूर शहरात रुग्णाची संख्या वरचेवर वाढत आहे. आता तर ग्रामीण भागातही कोरोनाचा रुग्ण आढळल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे .सोलापूर ते मोहोळ चे अंतर ३२ कि मी आहे. तसेच सांगोला ते पंढरपूर ,मंगळवेढा हे तालुका जवळच आहेत. सांगोल्यात कोरोनाचा रुग्ण आढळला आहे.
या पार्श्वभूमीवर वेळीच काळजी घेणे गरजेचे असल्याने नगरपरिषदेने सर्वेक्षण मोहीम सुरू केली आहे.आज मोहोळ शहरात आण्णा भाऊ साठे नगर प्रभाग क्र ७ मध्ये नगर परिषदच्या वतीने होम टू होम नागरिकाची तपासणी चालु केली आहे .

मोहोळ शहरात इन्फ्रारेड थर्मामीटर सह अत्यावश्यक उपकरणे आणली आहेत. आरोग्य विभागच्या माध्यमातून 3 टीम तयार केल्या आहेत. त्यामध्ये दवाखान्याचे एक व नगरपरिषद कर्मचारी दोन असे तीन कर्मचाऱ्यांची टिम तयार केली आहे. शहरातील एकही व्यक्ती सर्वेक्षणाच्या शिवाय राहणार नाही .अशी माहिती मोहोळ नगर परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. के. पाटील यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here