स्व. विष्णूपंत (तात्यासाहेब) कोठे यांच्या ८५ व्या जयंतीनिमित्त आरोग्य शिबिर संपन्न

0

स्व. विष्णुपंत (तात्यासाहेब )कोठे यांच्या ८५वा जयंती निमित्त शुक्रवार दिनांक ५ऑगस्ट २०२२ ते १०ऑगस्ट २०२२पर्यंत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.७०फूट रोड वरील, विष्णुपंत कोठे मेमोरियल स्कूल येथे हा उपक्रम राबवण्यात आला.

आज सोमवार दिनांक ८/८/२२ रोजी श्री मार्कंडेय सह.रूग्णालय सोलापूर यांच्या वतीने आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून  श्री. अविनाश बोमडयाल, श्री. विनायक कोंड्याल, डॉ. महेश आरकाल, डॉ. मोहनीश बोल्ली व देवेंद्र कोठे,रमेश यन्नम व प्रशालेच्या प्राचार्या  पुष्पा नायर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

डॉक्टरांनी मुलांना आरोग्य विषयक योग्य सल्ला दिला व आरोग्याचे महत्त्व सांगितले. या कार्यक्रमात विद्यार्थी व विद्यार्थिनींचा उत्सफूर्त सहभाग होता.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here