आरोग्य व पर्यावरणच्या साहित्याचा अनुवाद व्हावा : कुलगुरू फडणवीस

0

MH13NEWS Network
सोलापूर- विज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अनुवादाचा कार्य झालेला आहे. आरोग्य व पर्यावरण विषयाचा साहित्य सुध्दा अनुवादित झाला पाहिजे विशेष करून मराठी व उर्दूमध्ये याविषयावर काम करणे काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांमध्ये अनुवादबरोबर संशोधन कार्य सुध्दा मोठ्या प्रमाणावर घेणे आवश्यक आहे. आपण या कार्याची सुरूवात अहिल्यादेवीच्या साहित्याची करू या त्यांचा प्रशासकीय अनुभव उर्दूमध्ये अनुवाद करण्याच्या कार्याला आपण लवकरच सुरूवात करू या. युजीसीमार्फत आपण अनेक प्रोजेक्ट घेऊ शकता नवीन शिक्षण धोरणात संशोधनावर  भर देण्यात आले आहे, असे उद्गार डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी काढले. विद्यापीठाच्या भाषा संकुल व खादिमाने उर्दू फोरम सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मराठी-उर्दू भाषांतर कार्यशाळे’च्या उद्घाटन प्रसंगी काढले. त्यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.
सोलापूर विद्यापीठ उर्दू विभागाचे अधिष्ठाता डॉ. म. शफी चोबदार यांनी सर्वांचे स्वागत केले व अनुवादाचे महत्त्व विषद केले. डॉ. सुमय्या बागबान यांनी पाहुण्याचे ओळख करून दिले. फोरमचे अध्यक्ष विकारअहमद शेख यांनी विद्यापीठाबरोबर अनुवादमध्ये मोठा कार्य करण्याची इच्छा व्यक्त केली.


प्रमुख पाहुणे नागपूरचे ज्येष्ठ अनुवादक डॉ. म. असदुल्लाह यांनी सांगितले की, उर्दू व मराठीमध्ये बऱ्याच शब्दाचा आदान प्रदान झालेला आहे. पण आज निमित्त उर्दू-मराठी अनुवादक फार कमी भेटतात. नवीन अनुवादक शोधणे व तयार करणे अत्यंत आवश्यक आहेत. शाब्दिक अनुवादापेक्षा तात्विक अनुवाद गरजेचे आहे. या कार्यशाळेमार्फत नवीन अनुवादक तयार होतील व महाराष्ट्रासाठी एक गर्वाची गोष्ट होईल.
मराठीतील नाट्य साहित्य उर्दूमध्ये येणे गरजेचे आहे व उर्दूची शायरी मराठीत स्थांतरीत होणे आवश्यक आहे. या कार्यशाळेला महाराष्ट्रातून मोठा प्रतिसाद मिळाला. विद्यापीठ भाषा संकुल डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी आपले मोलाचे विचार व्यक्त केले व अनुदानाला मी स्वत:पासून सुरूवात करेल, अशी ग्वाही दिली. शेवटी डॉ. आयेशा पठाण यांनी आभार मानले.
ही कार्यशाळा पुढे दोन महिने साप्ताहिक तत्वावर ऑनलाईन झुमवर चालेल असे डॉ. शफी चोबदार यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here