प्रभाग 3 | हर घर तिरंगाने सजला परिसर ;आण्णांनी घेतला पुढाकार

0

हर घर तिरंगा अभियानांतर्गत पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत प्रभाग क्रमांक तीन येथे माजी सभागृह नेता सुरेश पाटील यांच्या वतीने राष्ट्रीय ध्वजाचे वाटप करण्यात आले.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा ही संकल्पना केली या आव्हानस प्रतिसाद देत भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक तथा माजी सभागृह नेता सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भवानी पेठ घोंगडे वस्ती तसेच प्रभाग क्रमांक तीन मध्ये जेमिनी सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्था, गुरुदत्त तरुण मंडळ, सिद्धारूढ मित्र मंडळ, दिल खुश मित्र मंडळ श्रीराम मित्र मंडळ महांतेश्वर मित्र मंडळ, समर्थ मित्र मंडळ, शक्ती देवी मित्र मंडळ, मानवी नगर सिद्धेश्वर भजनी मंडळ सोना नगर आधी भागामध्ये तिरंगा ध्वजाचे मोफत वितरण करण्यात आले 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येणार आहे प्रत्येक भारतीय नागरिकांच्या मनामध्ये देशभक्तीची चेतना निर्माण व्हावी यासाठी घरोघरी तिरंगा ध्वज फडकविण्यात येत आहे या उपक्रमात देखील नागरिकांमध्ये उत्साह असल्याचे दिसत आहे असे मनोगत यावेळी सुरेश पाटील यांनी व्यक्त केलं. तिरंगा ध्वज वाटप प्रसंगी आप्पा शहापूरकर, पांडुरंग घाटे, विजय पुजारी विश्वनाथ मंदकल, प्रकाश मरगल, डॉक्टर श्रीशैल उंबरे, बाळासाहेब स्वामी, बिपिन पाटील, आशिष दुलंगे विजय कोळी, यांच्या उपस्थितीत करण्यात आले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शहरातील वातावरण देशभक्तीने भारलेले आहे अमृत महोत्सवाचे औचित्य साधून माजी सभागृह नेता सुरेश पाटील यांनी मोफत ध्वज वाटप केले. यावेळी या भागातील नागरिकांनी हर घर तिरंगा उपक्रमास उस्फूर्त प्रतिसाद दिला. याप्रसंगी सुरेश पाटील मित्र परिवार तसेच युवा नेते बिपीन पाटील मित्र परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here