By-MH13 NEWS,वेब/टीम
दि.०५ -सोलापूर शहर गुन्हेशाखेच्या पोलिसांनी आज दि.०५ फेब्रुवारी रोजी रात्री १ च्या सुमारास पो.नाईक संतोष पापडे यांना मिळालेल्या माहितीनुसार, मुळेगाव लमाण तांडा, सोलापूर येथून एका पांढऱ्या रंगाच्या एस्टीम कार मधून हातभट्टी दारू जुना पुना नाका येथे येणार आहे.
लागलीच पो.नाईक पापडे यांनी इतर कर्मचारी यांच्या सोबत घेऊन जुना पुना नाका, सोलापूर येथे सापळा लावून एस्टीम कार क्रमांक एमएच १३ एएच ०८२६ या कारला शिताफीने पकडले. सदर वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये काळे रंगाचे भरलेले सात मोठ्या ट्यूब मध्ये ५६०लिटर हातभट्टी दारू मिळून आली. कार चालक अविनाश वालू चव्हाण यास ताब्यात घेतले आहे.कार व दारू मिळून सुमारे एक लाख आठ हजाराचा मुद्देमाल मिळून आला.
म्हणून आरोपीविरुद्ध दारुबंदी कायदा कलम ६५(अ)(ई) प्रमाणे फौजदार चावडी पो. ठाणे येथे पो.ना.संतोष पापडे यांनी रीतसर फिर्याद दिली आहे. ही कारवाई पथक पो.हवा.शांताराम वाघमारे, दीपक राऊत, संजय खरात, पो.नाईक संतोष पापडे, आप्पा पवार यांनी केली.