महापालिकेच्या वतीने महात्मा गांधीना अभिवादन

0
MH13NEWS Network
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने पुज्य महात्मा गांधी यांच्या महानिर्वाण दिनानिमित्त स्टेशन चौक येथील त्यांच्या पुर्णाकृती पुतळयास तसेच कौन्सिल हॉल येथील मा.महापौर यांच्या कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस मा.महापौर श्रीकाचंंना यन्नम यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी नगरसेवक विनोद भोसले, जनसंपर्क अधिकारी विजयकुमार कांबळे, सुमन जाधव,आप्पासाहेब बगले,अरूणा बेंजरपे, मलिनाथ हुणजे,मल्लू सकट,भास्कर सामलेटी, सुरेश लिंगराज, राजेंद्र अंबुरे अशोक खडके,नागनाथ जाधव, महादेव यळ्ळे,चंदन फुले,आदि उपस्थित होते.
तसेच देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी अशा हुतात्म्यांची आठवण म्हणून आज सकाळी 11वाजता महापालिकेतील अधिकारी व सेवक वर्ग दोन मिनिटे स्तब्धता पाळून हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात आला. यावेळी बरोबर 11 वाजता अग्निशामक दलाच्या मार्फत सायरन वाजविण्यात आल्यावर पालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी आपापल्या विभागात जागेवर उभे राहून दोन मिनिटे स्तब्धता पाळली व पुन्हा 11.02 मिनिटांनी सायरन वाजविणेत आला.
याप्रसंगी आयुक्त दिपक तावरे, .उपाआयुक्त अजयसिंग पवार, जनसंपर्क अधिकारी विजयकुमार कांबळे, अग्निशामक दल प्रमुख केदार आवटे, सुरेश लिंगराज,आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here