संभाजी ब्रिगेडच्या वतीने छत्रपती संभाजीराजे यांना अभिवादन
सोलापूर (प्रतिनिधी) स्वराज्याची दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज यांच्या 342 व्या राज्याभिषेक सोहळा निमित्त संभाजी ब्रिगेडच्या वतीने संभाजी ब्रिगेडच्या कार्यालयामध्ये अभिवादन करण्यात आले.
सोलापूरतील उद्योगपती जयप्रकाश फाळके यांच्या हस्ते महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी युवराज तर २३ व्या वर्षी रयतेसाठी छत्रपती झालेले आणि तिथून पुढील वादळी नऊ वर्षांत औरंग्याला सळो की पळो करून सोडणारे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी राजांना अजिंक्य योद्धे होते असे प्रतिपादन केले.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले, उपाध्यक्ष सिताराम बाबर ,उपाध्यक्ष गजानन शिंदे, शेळके, आकाश कदम ,राजेंद्र माने, शहाजी भोसले, अजय पाटील, अमोल सलगर ,उमेश जाधव ,अनिल माशाळे ,दत्ता जाधव, डॉक्टर स्वप्नील बिंदगे, संजय भोसले इत्यादी उपस्थित होते