राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन

0

MH13 NEWS NETWORK :
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंती दिनानिमित्त कौन्सिल हॉल येथील महापौर यांच्या कार्यालयात जिजाऊ माँ साहेब यांच्या प्रतिमेस महापौर श्रीकांचनाताई यन्नम यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर थोर भारतीय नेते व संत स्वामी विवेकानंद यांच्या जयंती दिनानिमित्त कौन्सिल हॉल येथील महापौर यांच्या कार्यालयात स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस महापौर श्रीकांचनाताई यन्नम यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी सभागृह नेते श्रीनिवास करली,नगरसेवक तथा शिवसेना शहर अध्यक्ष गुरुशांत धुत्तरगांवकर,विनोद भोसले,नगरसेविका राजेश्री चव्हाण, सुरेश लिंगराज, मल्लू सकट, अशोक खडके,नागनाथ जाधव,आकाश शिवशेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here