सोलापुरात ग्रीन कॉरिडोर | महिलेने केले दोन्ही किडनी व डोळयाचे दान

0

Mh13news Network

अश्विनी रूरल मेडिकल कॉलेज, हॉस्पीटल व रिसर्च सेंटर, कुंभारी येथे दिनांक 5 जानेवारी रोजी एक मेंदु मृत महिलेस दाखल करण्यात आले. मेंदु महिलाच्या नातेवाईकांनी रूग्णांचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दिनांक ६ जानेवारी रोजी मेंदु मृत महिलेवर शस्त्रक्रिया करून दोन किडनी व दोन डोळे काढण्यात आले. त्यापैकी रुबी हॉस्पीटल, पुणे येथील डॉ मनोज श्रीवास्तव व त्यांचे सहकारी यांनी एक किडनी प्राप्त (Retrive) करण्याची शस्त्रक्रिया करून ग्रीन कॉरीडोअर द्वारे पाठविण्यात आले तर दुसरी किडनी अश्विनी हॉस्पीटल, कुंभारी येथील रुग्णांस प्रत्यारोपण करण्यात आली. कुंभारी किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिय प्रत्यारोपण टीम डॉ. हेमंत देशपांडे, डॉ.विठ्ठल कृष्णा, डॉ.संदिप होळकर, डॉ.मयुर मस्तुद, डॉ. देढिया, डॉ.सुषमा संभारंभ, डॉ.निलेश मिसाळ, डॉ .अनुज ताटेवार, डॉ. पुजा देशमुख, डॉ .राहूल राठोड व डॉ. आदित्य दोरकर यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली. सदर शस्त्रक्रियेसाठी नर्सिंग स्टाफ, चतुर्थ कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

मेंदु मृत महिलेचे पती, मुलगा व भाऊ यांनी अतिशय मोलाचे सहकार्य करून सामाजिक बांधिलकी हेतूने दोन किडनी व डोळे असे पवित्र अवयव दानाचा नवीन पायंडा समाजामध्ये घालून दिला. ही बाब समाजासाठी एक आदर्श ठरणारी आहे.

शस्त्रक्रिया व किडनी प्रत्यारोपण प्रक्रिया यशस्वी केल्याबद्दल कार्यकारी विश्वस्त श्री बिपीनभाई पटेल, विश्वस्त सौ भारतीबेन पटेल, श्री मेहूल पटेल, अधिष्ठाता डॉ सुहास कुलकर्णी, उपअधिष्ठाता डॉ. सचिन मुंबरे, वैद्यकीय अधिक्षक डॉ गुणवंत नस्के व आरोग्य अधिक्षक डॉ सिध्देश्वर करजखेडे यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here