गुड न्यूज : आज ग्रामीण भागात एकही पॉझिटिव्ह आढळला नाही ; तर मृत्यू …

0

MH13 NEWS Network 

सोलापूर शहर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत असताना जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आजच्या दिवशी चांगली बातमी आहे .आज मंगळवारी एक ही कोरोना बाधित रुग्ण आढळून आला नाही, तर एकाही संसर्गित व्यक्तीचा मृत्यू झाला नाही अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात 43 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.यातील एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह .त्यामध्ये 26 पुरुष तर 17 महिलांचा समावेश आहे. आज पर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर उर्वरित 32 जणांवर उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असलेल्यामध्ये 18 पुरुष तर 14 महिलांचा समावेश आहे
रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींमध्ये चार पुरुष तर 1 महिलेचा समावेश होतो
सोलापूर जिल्ह्यात आत्तापर्यंत 1327 जणांची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 1297 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. यामध्ये हे 1255 निगेटिव्ह तर 42 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत आज मंगळवारी सात जणांचे अहवाल प्राप्त झाले त्या पैकी सात ही जण निगेटिव्ह आढळून आले आहेत
संस्थात्मक अलगीकरण केंद्रांमधून आज 77 जणांना सोडण्यात आले अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here