आनंदाची बातमी ; जिल्ह्यात ‘कोरोनामुक्त’ रुग्णांचं द्विशतक ; २१८ रुग्णांची कोरोनावर मात

0

महेश हणमे 9890440480

सोलापूरकरांसाठी ही मोठी दिलासादायक आणि समाधान देणारी बातमी आहे. ज्या महामारी मुळे भितीचे वातावरण सर्वत्र तयार झालंय. अशा रोगावर सोलापुरातील एक दोन नव्हे तर तब्बल 218 कोविड योद्ध्यांनी विजय मिळवला आहे.

कोरोनावर मात करीत सोलापूर जिल्ह्यातील आणखी 43 जण आज (२१ मे) एकाच दिवशी आपापल्या घरी बरे होऊन गेले आहेत. .त्यापैकी ३१ जणांना सकाळी सिंहगड येथील कोविड सेंटर मधून घरी सोडण्यात आले आहे तर ४ रुग्णांना अश्विनी हॉस्पिटल,कुंभारी येथील कोविड सेंटर मधून डिस्चार्ज देण्यात आला.

आज सायंकाळी शासकीय रुग्णालयातून आणखीन 8 जणांना मोठ्या आनंदाने वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत डिस्चार्ज देण्यात आला. सोलापूर जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेदिवस वाढत असताना ही जिल्ह्यासाठी दिलासादायक व समाधानाची बाब आहे.विशेष म्हणजे आज घरी सोडण्यात आलेल्यांमध्ये मध्ये ३ डॉक्टर तर 1 वर्षाच्या बालकाचा समावेश आहे. अशी माहिती कोरोना वोर्ड प्रमुख डॉ.प्रसाद यांनी दिली.

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. योग्य ते उपचार केल्यास या रोगावर विजय मिळवता येतो हे आता स्पष्ट होत आहे.

दरम्यान सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित 488 रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांमध्ये एका चिमुकली ते नव्वद वर्षाचे आजोबा कोरोनामुक्त झाले आहेत.

जिल्हा प्रशासनासोबत वैद्यकीय विभागाच्या मेहनतीमुळे रेड झोन मधील सोलापूर ग्रीन झोन कडे वेगाने जावं अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सोलापुरातील नागरिकांना एक आवाहन आहे की या आजाराचे थोडे जरी लक्षण आढळले तर त्वरीत उपचारासाठी शासकीय रुग्णालयात यावे. विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिकांनी आपली काळजी घ्यावी. खोकला, ताप जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.अंगावर आजार काढू नये.अनेक जण या संसर्गाच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजेच गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल होतात. परिणामी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू होतो. त्यामुळे आजार बळावण्याआधी उपचार घेणे महत्त्वाचे आहे.योग्य उपचार केल्याने नक्कीच कोरोनावर मात करता येते .शेकडोंनी रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत.

डॉ .प्रदीप ढेले,जिल्हा शल्यचिकित्सक,सोलापूर 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here