शाळकरी मुलांचे सत्कृत्य ; जखमी खारुताईचे वाचवले प्राण..

0

MH 13 News Network

शाळकरी मुलांचे सत्कृत्य ; जखमी खारुताईचे वाचवले प्राण
विद्यार्थ्यांसाठी शिक्षण जितके महत्त्वाचे असतेस त्यासोबत संस्कार, प्राणिमात्रांविषयी दया हे गुण विद्यार्थ्यांमध्ये बिंबवणे हे शिक्षकांचे कर्तव्य ठरते. शाळकरी मुलांमध्ये सत्कृत्य करण्याची शिकवण सोलापुरातील चंडक प्रशालेत देण्यात आल्याची सकारात्मक बाब समोर आली आहे.

मंगळवारी 10 जानेवारी रोजी ज. रा. चंडक प्रशाला , बाळे येथे एक खारुताई जखमी अवस्थेत स्काऊट गाईडच्या मुलांना आढळून आली. लगोलग ही बातमी त्यांनी आपले स्काऊट मास्तर श्री. प्रकाश वाघमारे यांना सांगितली. वाघमारे सरांच्या मदतीने त्यांनी पक्षी मित्र “वाईल्डलाईफ काँझर्वेशन असोसिएशन” सोलापूरचे उपाध्यक्ष श्री सुरेश क्षीरसागर व सदस्य ओंकार घुले, लखन भोगे यांना फोन करून बोलावलं आणि त्या खारुताईला जीवनदान दिले.

या प्रसंगी श्रीमती पवार श्रीमती पुजारी,
काशिद , प्रशालेचे पर्यवेक्षक सुभेदार, स्काऊट गाईड विद्यार्थी मोरया हणमे, ओंकार साखरे, प्रतीक करपे,राजकुमार पाटील , रोहित साळुंखे, संध्या लोंढे, पूर्वा भोसले, संगीता मलिक, सृष्टी पिंपळे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here