गवळी समाजाचा पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना जाहीर पाठिंबा

0

सोलापूर शहर गवळी समाजाच्या वतीनं २४८ शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ व्यापक बैठक बोलवण्यात आली होती.

यावेळी व्यासपीठावर समाजाचे समाजाचे युवक अध्यक्ष मनोज मलकूनाईक ,माजी सभागृह नेते नगरसेवक संजय कोळी ,अमर पुदाले ,नागेश भोगडे ,अनिल गवळी ,राजकुमार पाटील,सचिन कुलकर्णी ,बबलू अंजिखाने,अप्पा शहापूरकर , किसन अंजीखाने, सुरेश बहिरवडे, राजू परळकर ,पांडुरंग परळकर , सिधू बडवणे,आदींची उपस्थिती होती.

देशमुख वाड्याजवळ दुधाचा व्यवसाय करणारे अनेक समाज बांधव मोठ्या संख्येने राहत असल्यामुळे समाजाच्या अनेक समस्या मी अत्यंत जवळून पाहिले आहे. गवळी समाज मागील तीनही निवडणुकीत माझ्या पाठीमागे खंबीरपणे होता यावेळी की दिलेल्या पाठिंब्याच्या जोरावर ला जास्त मताधिक्‍य मिळू शकेल अशी आशा पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी यावेळी व्यक्त केले तसेच गवळी समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचही यावेळी आवर्जून सांगितलं.

पालक मंत्री विजयकुमार देशमुख यांच्यामुळे शहरात अनेक विकासकामे झाली आहेत .त्यामुळे त्यांना एक लाखाहून जास्त मताधिक्य मिळाले तरच आपल्याला बरे वाटेल, एक लाखाच्या खाली येता कामा नये ,तसेच संपूर्ण समाज आपल्या मागे राहील असे विधान गवळी समाजाचे युवक अध्यक्ष मनोज मलकु नाईक यांनी यावेळी व्यक्त केले.
या स्नेहमेळावा प्रसंगी गवळी समाजाचे ज्येष्ठ नेते अनिल गवळी यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला.

या वेळी समाजाचे ज्येष्ठ आप्पा शहापूरकर, सुरेश बहिरवाडे अनिल गवळी आदींची भाषणे झाली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंजिखाने ,मयुर अंजिखाने, यशवंत बुळसकर ,विनोद बडवणे आदींनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here