शेततळे, ठिबक सिंचनाच्या अनुदानासाठी निधी द्यावा – पालकमंत्री दत्तात्रय भरणे

0

सोलापूर – जिल्ह्यातील शेततळे, अस्तरीकरणे कागद, ठिबक सिंचन यांचे थकीत अनुदान देण्यासाठी निधी मिळावा. त्याचबरोबर जिल्ह्यातील १३२६१ कृषीपंपाच्या जोडणीची कार्यवाही व्हावी, अशी मागणी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक झाली. या बैठकीत पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हाधिकारी कार्यालयातून व्ही.सी.द्वारे सहभागी झाले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, कृषी सभापती अनिल मोटे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, विशेष अधिकारी पी शिवशंकर, परिविक्षाधीन आयएएस अधिकारी अंकित, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार आदी उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले, जिल्ह्यातून मागेल त्याला शेततळे योजनेला अतिशय मागणी आहे. त्याचबरोबर शेततळेसाठी लागणारा कागद, ठिबक सिंचनचे अनुदान थकित आहे. हे अनुदान थकित आहे. हे  अनुदान देण्यासाठी निधी द्यावा. जिल्ह्यात १३२६१ कृषीपंपाच्या वीज जोडण्या बाकी आहेत. त्या लवकरात लवकर जोडून मिळाव्यात.’

पालकमंत्री भरणे यांनी शेतकऱ्यांना बांधावर खते आणि बियाणे देण्याच्या सूचना केल्या होत्या. यानुसार ७४७१ शेतकऱ्यांना आतापर्यंत बांधावर २२१७० क्विंटल खताचे आणि १७१ क्विंटल बियाणे वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज  यांनी दिली.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे, जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे आदी उपस्थित होते.

दृष्टीक्षेपात खरीप हंगाम –

सोलापूर जिल्ह्यात २.७३ लाख हेक्टर खरीप पेरणी नियोजन.

प्रामुख्याने बाजरी, मका, तूर, उडीद, सोयाबीन, मूग, सूर्यफुल पीके.

कृषी सेवा केंद्र ८४८५.

खाजगी कंपन्या व महाबीजमार्फत ३१९९८ क्विंटल‍ बियाण्यांचा पुरवठा होणार

रासायनिक खते २,११,३९० मे. टनपैकी ४३०५९ मे.टन पुरवठा झाला.

पीक कर्ज वाटप १४३८.४१ कोटीचे उद्दिष्ट्ट आहे. आतापर्यंत ११६.१० कोटी रुपये वाटप

कृषी वीज पंप जोडणीसाठी १३२६१ उद्दिष्ट्ट, ३२८० कोटी निधी प्रस्तावित.

मागेल त्यास शेततळेसाठी १५ कोटी /निधी  शेततळे अस्तरीकरणासाठी ४.३२ कोटी रुपयांचा  निधी

ठिबक सिंचनासाठी मागील वर्षाची प्रलंबित देणे साठी ३० कोटी रुपयांची मागणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here