‘राष्ट्रवादी’चा उपक्रम ; मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचा अनेकांना लाभ

0

MH13 NEWS Network

संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर संघटक सागर शितोळे यांच्या वतीने सोलापूर शहरातील कोरोनाच्या महामारी मध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता आपलं काम करणाऱ्या आणि आपलं कर्तव्य बजावणाऱ्या पत्रकार बांधव आणि त्यांच्या परिवारासाठी मोफत हृदयरोग तपासणी शिबिर घेण्यात आली या शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष भारत जाधव आणि माधवबाग क्लिनिक च्या डॉक्टर स्वाती रेणके यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी विद्यार्थी शहर अध्यक्ष निशांत सावळे, वाहतूक आघाडी अध्यक्ष विकी घाटंगरे, शहर उत्तर कार्याध्यक्ष शिवराज विभुते, पर्यावरण आघाडी शहरअध्यक्ष सोमनाथ शिंदे, ज्योतिबा गुंड, आयुब पठाण, किशोर चव्हाण, आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष भारत जाधव म्हणाले, पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून त्यांनी कोरोना महामारीच्या काळात आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावले आहे यासह त्यांचे कुटुंबही धकाधकीच्या जीवनामुळे आपल्या आरोग्याकडे लक्ष नसते, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शहर संघटक सागर शितोळे यांनी पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबासाठी घेतलेले मोफत हृदय तपासणी शिबिर हे खरच कौतुकास्पद असल्याचे मत जाधव यांनी व्यक्त केले.

सागर शितोळे हा युवक नेहमी युवकांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी झटणारा युवक आहे. त्याने पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी घेतलेल्या हृदयरोग तपासणी शिबिर हे खरच कौतुकास्पद असून अशा शिबिराच्या माध्यमातून पत्रकारांना नक्की लाभ होईल असे मत माधवबाग क्लिनिकच्या डॉ. स्वाती रेणके यांनी व्यक्त केले.

पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असून ते स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत असतात त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांची काळजी करणे हे आपले कर्तव्य असून येणाऱ्या काळात पत्रकारांसाठी आणखीन विविध योजना राबवत असल्याचे मतं राष्ट्रवादी शहर संघटक सागर शितोळे यांनी व्यक्त केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर संघटक सागर शितोळे यांनी पत्रकार आणि त्यांच्या बांधवांसाठी घेतलेले मोफत हृदयरोग तपासणी शिबिर यशस्वी करण्यासाठी जनक पारवे, प्रवीण माने, साहिल शेख, सुहास तोरवी, तर्पण टेकाळे, वीरेश बाळूगोटे, यांनी परिश्रम घेतले.

हे शिबीर 12 जुलै व 13 जुलै रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत दत्त चौक येथील माधवबाग क्लिनिक येथे होणार आहे याचा लाभ पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी घ्यावा असे आवाहन सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटक तथा आयोजन सागर शितोळे यांनी केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here