‘या’मुळे… माजी आमदार दीपक साळुंखेवर गुन्हा दाखल

0

MH13 NEWS Network

सांगोला : टेंभू योजनेचे पाणी जवळा परिसरात सोडण्यात आल्यानंतर त्याच्या नियोजनासाठी बंदी असतानाही सोशल डिस्टन्स न ठेवता बैठक घेऊन शासकीय आदेशाचा भंग केल्याप्रकरणी माजी आमदार दीपक साळुंखे यांच्यासह जवळा बुरंगेवाडी व सोनंद येथील शेतकऱ्यांविरोधात सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, टेंभू योजनेतून शेतीसाठी पाण्याचे उन्हाळी आवर्तन चाचणीसाठी जवळा व परिसरात पाणी सोडण्यात येणार आहे. त्याच्या नियोजनासाठी आठ एप्रिल रोजी सोनंद (ता. सांगोला) येथील मराठा व बुरंगेवाडी येथील सुभाष बावधने यांच्या शेतातील पत्राशेडमध्ये व पांडुरंग नारायण साळुंखे (रा. वळा) यांच्या लिंबू मळ्यात बैठका झाल्या. माजी आमदार साळुंखे यांच्यासह सतीश काशीद, महादेव पाटील, प्रकाश काशीद, साहेबराव काशीद, दीपक काशीद, राजाराम काशीद, तानाजी काशीद, संभाजी काशीद, (सर्व रा. सोनंद) सुभाष बावधाने, श्रीमंत बुरुंगे, संतोष शेटे, गणेश माने, सुभाष बुरंगे, नितीन बुरंगे, मोहन बुरंगे, (सर्व रा. बुरुंगेवाडी) विजयकुमार देशमुख, पांडुरंग साळुंखे, वसंत साळुंखे, चंद्रकांत देशमुख, प्रशांत साळुंखे, विश्वास साळुंके, सज्जन गायकवाड, अंकुश कोळी, बाळासाहेब कोळी, सुनील साळुंखे, (सर्व रा. जवळा) या शेतकऱ्यांवर पोलीस नाईक संजय चंदनशिव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here