भाजपचे माजी नगरसेवक सुनिल कामाठी यांचे निधन

0

MH13 News Network

भाजपचे माजी नगरसेवक सुनिल कामाठी यांचे निधन

सोलापूर : भाजपचे माजी नगरसेवक आणि खड्डा तालीम श्री शिवजन्मोत्सव मंडळाचे संस्थापक सुनिल दशरथ कामाठी (वय ४३) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्यावर दोन दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. रविवारी सकाळी उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले.

सोमवारी सायंकाळी ५ वाजता अंत्ययात्रा सुरु होणार असून मोदी स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, वहिनी, पुतणे असा परिवार आहे.

सुनिल कामाठी यांनी खड्डा तालीमच्या माध्यमातून मोठे संघटन उभे केले होते. माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख यांचे खंदे समर्थक अशी त्यांची ओळख होती. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशातील ६०० हून श्री शिवजन्मोत्सव मंडळांना छत्रपति श्री शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित मूर्तींचे वाटप आणि इतर भरीव समाज कार्यामुळे त्यांची लोकप्रियता मोठी होती. नगरसेवकपदाच्या कार्यकाळात सुनिल कामाठी यांनी माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख यांच्या माध्यमातून प्रभागाच्या विकासासाठी प्रचंड निधी आणून विकासकामे केल्याने नागरिकांत त्यांची लोकप्रियता खूप होती. सुनिल कामाठी यांच्या निधनाची वार्ता कळताच माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख यांनी अधिवेशनातून तातडीने सोलापूरला धाव घेतली आहे.

निधनाचे वृत्त कळताच त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी सर्वपक्षीय नेते, हजारो कार्यकर्ते, समाजातील विविध स्तरांतील नागरिक मोठ्या संख्येने निवासस्थानी एकत्र झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here